लग्नात दिली बुलेट, साडेपाच तोळे सोने अन् २ लाख रोख तरीही विवाहितेचा जाच संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 06:14 PM2022-04-06T18:14:24+5:302022-04-06T18:22:09+5:30

सासरचे विवाहितेला घर बांधकामासाठी पाच लाख रुपये माहेरून आणण्यासाठी तगादा लावून मानसिक व शारीरिक त्रास देत होते.

charges file against in-laws for torturing daughter-in-law over dowry | लग्नात दिली बुलेट, साडेपाच तोळे सोने अन् २ लाख रोख तरीही विवाहितेचा जाच संपेना

लग्नात दिली बुलेट, साडेपाच तोळे सोने अन् २ लाख रोख तरीही विवाहितेचा जाच संपेना

Next
ठळक मुद्देसासरच्या पाच जणांविरुद्ध गिरड ठाण्यात तक्रार दाखल

वर्धा : लग्नात जावयाला बुलेट...साडेपाच तोळे सोने.. अन् तब्बल दोन लाख रुपये रोख रुपये देऊनही विवाहितेला सासरच्यांनी घर बांधकामासाठी पाच लाख रुपये आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच मंडळीविरुद्ध गिरड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विवाहितेचे लग्न आशुतोष प्रमोद पाठक याच्याशी झाले होते. विवाहितेच्या घरच्यांनी लग्नात जावयाला साडेपाच तोळे सोने, बुलेट गाडी, भांडी व फर्निचर सहा लाखाचे तसेच दोन लाख रुपये रोख रक्कम असा एकूण १२ लाख ४० हजाराचा ऐवज हुंडास्वरूपात दिला होता.

हा सर्व मुद्देमाल सासरच्यांनी त्यांच्याकडे ठेवला. आता घर बांधायचे असल्याने पती आशुतोष पाठक, प्रमोद पाठक, साधना पाठक, पौर्णिमा तिवारी, शैलेश तिवारी हे विवाहितेला घर बांधकामासाठी पाच लाख रुपये माहेरून आणण्यासाठी तगादा लावून मानसिक व शारीरिक त्रास देत होते. तसेच पौर्णिमा हिने पायाने विवाहितेच्या पोटावर मारहाण करीत अपमानित केले. अखेर विवाहितेने जाचाला कंटाळून याबाबतची तक्रार गिरड पोलिसात दिली.

Web Title: charges file against in-laws for torturing daughter-in-law over dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.