सेवाग्राम आश्रमात दिवसभर फिरला चरखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:27+5:30
आश्रम परिसरालगतच्या नयी तालिम समिती परिसरातील घंटी घरापासून सकाळी रामधून गात प्रभातफेरी काढण्यात आली. आश्रमातील स्मारकांना वळसा घालून बापू कुटी प्रांगणात सर्वधर्म प्रार्थना झाली. त्यानंतर सकाळी ६ वाजतापासून अखंड सूत्रयज्ञाला सुरुवात झाली. आश्रमातील ज्येष्ठ कुसूम पांडे, नथ्थुजी चव्हाण, डॉ. शिवचरण ठाकूर, प्रशांत ताकसांडे व पवन गणवार यांनी सूतकताईला प्रारंभ केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील महात्मा गांधी आश्रमात राष्ट्रपिता यांच्या ७२ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासून अखंड सूतकताई करुन बापूंना आदरांजली वाहिण्यात आली. आश्रमात दिवसभर चालेल्या चरख्यावर ४० जणांनी ४६ हजार मीटर सूतकताई करण्यात आली.
आश्रम परिसरालगतच्या नयी तालिम समिती परिसरातील घंटी घरापासून सकाळी रामधून गात प्रभातफेरी काढण्यात आली. आश्रमातील स्मारकांना वळसा घालून बापू कुटी प्रांगणात सर्वधर्म प्रार्थना झाली. त्यानंतर सकाळी ६ वाजतापासून अखंड सूत्रयज्ञाला सुरुवात झाली. आश्रमातील ज्येष्ठ कुसूम पांडे, नथ्थुजी चव्हाण, डॉ. शिवचरण ठाकूर, प्रशांत ताकसांडे व पवन गणवार यांनी सूतकताईला प्रारंभ केला. नयी तालिम समिती अंतर्गत येणाऱ्या आनंद निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टकळी, पेटीचरख्यावर आश्रम परिसरात सूतकताई केली. त्यानंतर दिवसभरात आश्रमाला भेट देणाºया अनेकांनी सूतकताई करुन बापूंना आदरांजली वाहिली. यात गांधी सेवा संघाचे अध्यक्ष आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे माजी मंत्री कनकमल गांधी यांचाही समावेश होता. सायंकाळी साडेपाच वाजता प्रार्थना भूमीवर सामूहिक सूत्रयज्ञ झाले. सायंकाळी दैनंदिन प्रार्थना झाल्यावर बापू कुटीच्या वºहांड्यात सर्व धर्माची भजने झालीत. आश्रमातील सर्व कार्यक्रमामध्ये आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, मुकुंद मस्के, जालंधरनाथ, सिध्देश्वर उंबरकर, नामदेव ढोले, बाबाराव खैरकार, आकाश लोखंडे, पंडीत चन्नोळे, महादेव लोखंडे, हणुमान पिसुड्डे, रामसिंग बघेल, रवींद्र भुते, शोभा कवाडकर, सुचित्रा झाडे, संगिता चव्हाण, रूपाली उगले, अश्विनी बघेल, दीपाली उंबरकर, जयश्री पाटील, माधुरी चांभारे, संगिता बारई, सिंहगड पब्लिक स्कूल, बसमत येथील विद्यार्थी व शिक्षक, ईस्लाम हुसैन, संजय आत्राम, शंकर वाणी, जानराव खैरकर, सुनील फोकमारे, सदा मून आदी सहभागी झाले होते.