मुख्यमंत्र्यांनी देवळीकरांना दिलेला शब्द पाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:42 PM2018-09-01T23:42:34+5:302018-09-01T23:46:20+5:30
निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवळीकरांना पंतप्रधान आवास योजनेबाबत दिलेला शब्द पाळला आहे. राज्यात पहिल्यांदा ‘क’ स्तरीय नगर परिषदांमध्ये देवळीला हा मान मिळाला आहे. ८२० घरांची मंजूरी प्राप्त झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवळीकरांना पंतप्रधान आवास योजनेबाबत दिलेला शब्द पाळला आहे. राज्यात पहिल्यांदा ‘क’ स्तरीय नगर परिषदांमध्ये देवळीला हा मान मिळाला आहे. ८२० घरांची मंजूरी प्राप्त झाली आहे. नागरिकांच्या माहितीसाठी अडीच लाखांच्या खर्चातून बांधलेल्या घरकुलाच्या मॉडेलचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केले.
स्थानिक न.प.च्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, माजी खासदार सुरेश वाघमारे आदींची उपस्थिती होती. माजी पंतप्रधान तथा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देवळी न.पं.च्या सभागृहाला देवून येथील पालिका पदाधिकाऱ्यांनी या महामानवाच्या स्मृती जोपासल्या आहेत. त्यांचे हे कार्य भारतातील इतर नागरिकांना प्रेरणा देणारे ठरले असेही याप्रसंगी ना. पाटील यांनी सांगितले. .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुलाबाबत देवळी न.प.ला संपूर्ण राज्यात पहिली पसंती दिली. याबद्दल मी त्यांचा आभारी आहो. या योजनेच्या माध्यमातून गरीबांचे पक्क्या घराबाबतचे स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे, असे यावेळी मनोगत व्यक्त करताना खा. रामदास तडस यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान ना. पाटील यांच्या हस्ते ५० लाखांच्या खर्चातून पूर्णत्वास जाणाºया हरित पट्टे योजनेचा शुभारंभ वृक्षारोपण करून करण्यात आला. शिवाय न.प. सभागृहाचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी’ असे नामकरण आणि घरकुलाच्या मॉडेलचे लोकार्पण करण्यात आले. मागील वर्षी देवळी न.प.ला हागणदारीमुक्त बाबत प्राप्त झालेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्काराच्या उर्वरीत ७० लाखांच्या धनादेशाचे प्रमाणपत्र ना. पाटील यांच्या हस्ते न. प. पदाधिकाºयांना देण्यात आले. शासनाकडून घरकुलाचे पैसे येण्याची वाट न पाहता बांधकामाला स्वत:च्या खर्चातून सुरूवात केल्याबद्दल जगदीश गोबाडे, देवका तराळे, अविनाश उगेमुगे व साधना खेरूडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रास्ताविक नगराध्यक्ष सुचिता मडावी यांनी केले तर आभार न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर यांनी मानले. कार्यक्रमाला न.प. मुख्याधिकारी अंकुश जाधव, न.प. गटनेता शोभा तडस, सभापती कल्पना ढोक, सारीका लाकडे, सुनीता बकाणे, सुनीता ताडाम, पं.स. सभापती विद्या भुजाडे, जयंत येरावार, नगरसेवक नंदू वैद्य, संध्या कारोटकर, संगीता तराळे, मारोती मरघाडे, मिलिंद ठाकरे, राहुल चोपडा, जि. प. सदस्य मयुरी मसराम आदी उपस्थित होते.