नगराध्यक्षांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचा ‘एक तास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:04 PM2019-04-01T23:04:38+5:302019-04-01T23:04:53+5:30
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होती. या सभेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे वर्ध्यात आले होते. सभेपूर्वी या दोन्ही मंत्री महोदयांनी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या निवासस्थानी भेट देत तब्बल एक तास घालविला. यावेळी विविध मुद्दयांवर चर्चा रंगली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होती. या सभेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे वर्ध्यात आले होते. सभेपूर्वी या दोन्ही मंत्री महोदयांनी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या निवासस्थानी भेट देत तब्बल एक तास घालविला. यावेळी विविध मुद्दयांवर चर्चा रंगली.
नगराध्यक्ष अतुल तराळे भारतीय जनता पक्ष तसेच संघाचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची तराळे यांच्याकडे ये-जा असते. सोमवारी सकाळी ११ वाजता प्रचारसभेला सुरुवात होणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे दोघेही एकाच हेलिकॉप्टरने सेवाग्रामच्या हेलिपॅडवर उतरले. तेथून ते वाहनाने थेट नगराध्यक्ष तराळे यांच्या घरी पोहोचले. यावेळी नगराध्यक्षांचे वडील मोतीरामजी तराळे यांच्यासह परिवाराने त्यांचे स्वागत केले. जवळपास एक तास विविध विषयांवर चर्चा करून वर्ध्यातील राजकीय घडामोडींचा आढावाही घेतला. यावेळी पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. प्रचार सभेच्या तयारीकरिता वर्ध्यात सतत लक्ष ठेवून असलेले वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही रविवारी नगराध्यक्ष यांच्या निवासस्थानी बैठक घेतली.