‘समृद्धी’च्या पुलाखाली चिखल विरूळ-रसुलाबाद मार्ग झाला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 05:00 AM2021-09-26T05:00:00+5:302021-09-26T05:00:07+5:30
रसुलाबाद ते विरुळ रस्त्यावर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली. यामुळे नागरिकांना पुलाखालील बोगद्यातून विरुळ आणि रसुलाबाद येथे जावे लागते. मात्र, पुलाखाली पावसाचे पाणी साचून चिखल साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. चिखल असल्यामुळे नागरिकांना वाहने बंद करून हातात धरुन न्यावी लागत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : रसुलाबाद, विरुळ रस्त्याच्या मधोमध समृद्धी महामार्ग गेल्याने पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, पावसामुळे पुलाखाली चिखल साचला असल्याने विरुळ ते रसुलाबाद हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
रसुलाबाद ते विरुळ रस्त्यावर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली. यामुळे नागरिकांना पुलाखालील बोगद्यातून विरुळ आणि रसुलाबाद येथे जावे लागते. मात्र, पुलाखाली पावसाचे पाणी साचून चिखल साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. चिखल असल्यामुळे नागरिकांना वाहने बंद करून हातात धरुन न्यावी लागत आहेत. शेतात बैलबंडी नेण्यासाठीदेखील शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याने पुलाखालील रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा, अशी मागणी नागरिकांसह शेतकऱ्यांतून केली जात आहे.
नाल्याच्या पुरामुळे टेंभरी - परसोडीचा संपर्क अडचणीत
- विरूळ (आकाजी) : मुसळधार पावसामुळे परसोडी - टेंभरी गावाच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या पुलाला पूर आल्याने काही काळ दोन्ही गावांचा संपर्क शुक्रवारी तुटल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेतातील मजूर, नागरिक, विद्यार्थी यांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली. पावसाळ्यात नेहमीच मुसळधार पावसामुळे या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. संबंधित प्रशासनाला येथील ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊन या रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी केली. परंतु, ग्रामस्थांच्या या मागणीला संबंधित विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली. या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी येथील सरपंच सुरेखा पंढरे यांनी केली आहे.