चाईल्ड हेल्पलाईन नंबर आता शालेय पुस्तकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:47 AM2018-06-16T11:47:34+5:302018-06-16T11:47:41+5:30

बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय पुस्तकात चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या इयत्ता तिसरीच्या पर्यावरणशास्त्र पुस्तकात तो दिला असून लवकरच पहिली ते पाचवीर्यंतच्या पुस्तकांतही हा क्रमांक समावेशित केला जाणार आहे.

Child helpline number now in school book | चाईल्ड हेल्पलाईन नंबर आता शालेय पुस्तकात

चाईल्ड हेल्पलाईन नंबर आता शालेय पुस्तकात

googlenewsNext
ठळक मुद्देएनसीईआरटीचा पुढाकार बाल लैंगिक शोषणाबाबत जागृतीचा मुद्दा

प्रशांत हेलोंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय पुस्तकात चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या इयत्ता तिसरीच्या पर्यावरणशास्त्र पुस्तकात तो दिला असून लवकरच पहिली ते पाचवीर्यंतच्या पुस्तकांतही हा क्रमांक समावेशित केला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान व प्रशिक्षण केंद्राने (एनसीईआरटी) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सत्रापासून (२०१८) तिसरीच्या इव्हीएस-एनव्हायरन्मेंटल सायन्स पुस्तकात आणि यानंतर पहिली ते पाचवीच्या भाषा व गणित तसेच चवथी आणि पाचवीच्या पर्यावरणशास्त्र या पुस्तकात समाविष्ट करणार आहे.
बाल लैंगिक शोषणाबाबत शालेय विद्यार्थी व शिक्षकांत जागृती व्हावी म्हणून शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल सुचविणारा २५ पानांचा अहवाल डॉ. खांडेकर, अनघा इंगळे, सावित्री, गिरीशा, मोहम्मद कादीर, अन्विता, प्रीती, डॉली, अनुरथी, सुमेध, निखिल व श्रीनिधी दातार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर व एनसीईआरटीला डिसेंबर २०१६ मध्ये पाठविला होता. यावर आतापर्यंत काय कार्यवाही केली, अशी विचारणा आरटीआय अंतर्गत केली होती. यावर एनसीईआरटी शैक्षणिक विभागाच्या डीन प्रा. सरोज यादव यांनी १४ जून रोजी प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर यांना दिली.

काय आहे चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८
१०९८ हा टोल फ्री टेलि-हेल्पलाईन नंबर चाईल्ड हेल्पलाईन नंबर म्हणून चाईल्डलाईन इंडिया फाऊंडेशनतर्फे केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने १९९६ मध्ये तयार केला होता. संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी ही भारतातील एकमेव व सर्वांत व्यापक अशी २४ तास चालू असणारी फोन सेवा आहे. ही सेवा देशातील ३६६ शहरांत, जिल्ह्यांत तसेच ३४ राज्यात कार्यरत आहे. राज्याच्या शालेय विभागानेही यावर सकारात्मक विचार करावा म्हणून डॉ. खांडेकर राज्य शासनाशी पत्रव्यवहार करीत आहेत.


एनसीईआरटीचे हे पाऊल शाळा व इतर शैक्षणिक केंद्रांना सुरक्षित जागा बनविण्यास मदत करेल. यामुळे मुलांना स्वत:ची सुरक्षा तसेच तक्रार करण्याच्या माध्यमाची माहिती होईल. घटना घडल्यास योग्य ठिकाणी मदत घेण्याची शक्ती विद्यार्थी, शिक्षक व पालकांत निर्माण होईल. मुलांची शालेय पुस्तके विद्यार्थी, शिक्षकांसह पालकही वाचत असतात. यामुळे एनसीईआरटीचे हे पाऊल बाल लैंगिक शोषण कमी करण्यात मैलाचा दगड ठरणार आहे. यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता.
- प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर, न्यायवैद्यकशास्त्र, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम.

Web Title: Child helpline number now in school book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.