‘चाईल्ड लाईन’ने रोखली तब्बल पाच मुलींची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:00 AM2021-12-06T05:00:00+5:302021-12-06T05:00:16+5:30
लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल, तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. १९७८ च्या कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय अठरा, तर मुलाचे एकवीस वर्षे ठरविण्यात आले आहे. यापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलीचा विवाह लावून देणाऱ्यांवरही कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन कारवाई होते.
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘चाईल्ड ट्रॅफिकिंग’ म्हणजेच मुलांची तस्करी, तसेच बालविवाह हा प्रकार कायद्यान्वये गुन्हा आहे. पण सध्याच्या विज्ञान युगातही अनेक गैरसमजांना बळी पडून हे दोन्ही प्रकरण समाजात होत असल्याचे चित्र बघावयास मिळते. मागील अकरा महिन्यांत ‘चाईल्ड लाईन’च्या मदतीने तब्बल पाच मुलींची तस्करी, तसेच तीन बालविवाह रोखण्यात आले.
लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल, तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. १९७८ च्या कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय अठरा, तर मुलाचे एकवीस वर्षे ठरविण्यात आले आहे. यापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलीचा विवाह लावून देणाऱ्यांवरही कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन कारवाई होते. पण याच नियमाला बगल दिल्याचे तीन प्रकरणांत लक्षात आल्याने हे तिन्ही बालविवाह ‘चाईल्ड लाईन’च्या मदतीने रोखण्यात आले आहे. तर, पाच मुलांची तस्करी ‘चाईल्ड लाईन’च्या स्वयंसेवकांनी रोखली आहे.
एका बाल कामगाराची केली सुटका
- मागील अकरा महिन्यांत तब्बल ५१० प्रकरणे ‘चाईल्ड लाईन’च्या मदतीने हाताळण्यात आली आहेत. यात बाल कामागारांचे एक प्रकरण असून, या प्रकरणातील एका बाल कामगाराची सुटका करण्यात आली आहे.