श्वानांच्या हल्ल्यात चितळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 09:27 PM2019-06-24T21:27:22+5:302019-06-24T21:27:39+5:30

आपल्या नैसर्गिक अधिवासाची वाट चुकलेले चितळ पाण्याच्या शोधार्थ शहरालगतच्या डिगडोह रस्त्यावर आले असता दहा ते पंधरा श्वानांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान गोधंळलेल्या स्थितीतील या चितळने सरळ शहराकडे धुम ठोकून बसस्थानकाजवळील अग्रवाल धर्मशाळेत आश्रय घेतला. श्वानांच्या या हल्ल्यात जखमी झालेले चितळ निलेश येळणे या तरुणाच्या निदर्शनास येताच त्याने श्वानांच्या कळपाला हाकलून लावले.

Chital injured in the attack of dogs | श्वानांच्या हल्ल्यात चितळ जखमी

श्वानांच्या हल्ल्यात चितळ जखमी

Next
ठळक मुद्देबचावासाठी धर्मशाळेत घेतला आश्रय

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : आपल्या नैसर्गिक अधिवासाची वाट चुकलेले चितळ पाण्याच्या शोधार्थ शहरालगतच्या डिगडोह रस्त्यावर आले असता दहा ते पंधरा श्वानांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान गोधंळलेल्या स्थितीतील या चितळने सरळ शहराकडे धुम ठोकून बसस्थानकाजवळील अग्रवाल धर्मशाळेत आश्रय घेतला. श्वानांच्या या हल्ल्यात जखमी झालेले चितळ निलेश येळणे या तरुणाच्या निदर्शनास येताच त्याने श्वानांच्या कळपाला हाकलून लावले.
जखमी चितळाला ताब्यात घेत घटनेची माहिती निलेश येळणे याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. सोमवारचे सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान एक चितळ डिगडोह रस्त्यावर श्वानांच्या कळपापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सैरावैर पळत असताना नागरिकांना दिसले. शिवाय ते चितळ जखमी असल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान या चितळाने शहराच्या दिशेने धुम ठोकली. तसेच स्थानिक श्यामसुंदर अग्रवाल धर्मशाळेत आश्रय घेतला. त्यावेळी निलेश येळणे यांनी नजर त्याच्यावर पडली. निलेश याने श्वानाच्या कळपाला हाकलून लावत जखमी चितळाला ताब्यात घेत घटनची माहिती वनरक्षक सोनोने, जाकीर शेख यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमी चितळाला पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या करुणाश्रमात उपचारासाठी पाठविले.

Web Title: Chital injured in the attack of dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.