दरवाढीने लाल मिरची झाली आणखी तिखट
By admin | Published: July 15, 2015 02:41 AM2015-07-15T02:41:42+5:302015-07-15T02:41:42+5:30
बाजारपेठेत लाल मिरचीची आवक कमी झाली असून मागणी वाढली आहे.
वर्धा : बाजारपेठेत लाल मिरचीची आवक कमी झाली असून मागणी वाढली आहे. परिणामी ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाऱ्या मिरचीसाठी ग्राहकांना १२० ते १४० रुपये मोजावे लागत आहेत. मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने उत्पादक व विक्रेता सुखावले आहेत. ग्राहकांना मात्र महागाईचा फटका सहन करावा लागत आहे.
सरासरी एकरी पाच ते सहा क्विंटल हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतात. हिरव्या मिरचीला देखील सतत मागणी असल्याने ४० ते ६० रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होत आहे. त्यामुळे उत्पादक हिरवी मिरची लाल होण्याची प्रतीक्षा करीत नाहीत. मागील वर्षीपेक्षा यंदा लाल मिरचीचे दर प्रती किलो २० ते ४० रुपयांनी वाढले आहेत.
आजही लाल मिरची विकत घेउन त्यापासून तिखट बनविण्याचे प्रचलन हे ग्रामीण भागात जास्त आहे. परंतु उत्पादन कमी असल्याने मिरचीचे दर पुढेही चढेच राहणार, अशी शक्यता विक्रेते व्यक्त करीत आहे. आहे.(शहर प्रतिनिधी)