अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:22 AM2019-06-12T00:22:24+5:302019-06-12T00:24:47+5:30
गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतलेल्या एकाला पोलिसी हिसका देत विचारपूस केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्यांची कबुली खरांगणा पोलिसांना दिली आहे. या चोरट्याकडून एक चोरीची दुचाकी व एक बॅटरी पोलिसांनी जप्त केली आहे. प्रशांत प्रभाकर राऊत (२६), असे आरोपीचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतलेल्या एकाला पोलिसी हिसका देत विचारपूस केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्यांची कबुली खरांगणा पोलिसांना दिली आहे. या चोरट्याकडून एक चोरीची दुचाकी व एक बॅटरी पोलिसांनी जप्त केली आहे. प्रशांत प्रभाकर राऊत (२६), असे आरोपीचे आहे.
मोरांगणा येथील रहिवासी असलेल्या तक्रारकर्त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने महाकाळी येथील मंदिर परिसरातून चोरून नेल्याची तक्रार खरांगणा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपास सूरू केला. दरम्यान खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रशांत राऊत याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. इतकेच नव्हे तर त्याने देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही ठिकाणीही चोºया केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची दुचाकी व एक बॅटरी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.