रस्ता बांधकामात चुरीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:26 PM2018-02-01T23:26:24+5:302018-02-01T23:26:37+5:30
हिंगणी ते शिवणगाव मार्गे चौकी, हिंगणा, जुनगड, केळझर जाणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याला नव्याने मुलामा देण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी केल्यास डांबरीकरण किती काळ तग धरेल, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
ऑनलाईन लोकमत
घोराड : हिंगणी ते शिवणगाव मार्गे चौकी, हिंगणा, जुनगड, केळझर जाणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याला नव्याने मुलामा देण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी केल्यास डांबरीकरण किती काळ तग धरेल, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. निकृष्ट दर्जाच्या कामाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
हिंगणी-शिवनगाव या पाच किमी अंतर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तथा जुन्या डांबरीकरणाच्या रस्त्याला डांबराचा नव्याने मुलमा देत नवे रूप देण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. नवा डांबराचा कोट टाकण्यापूर्वी रस्त्यावर टाकले जाणारे डांबर की आॅईल? हा संशोधनाचा विषय ठरत आहे. या रस्त्यावर असणारी वाहनांची वर्दळ पाहता या रस्त्याला अल्पावधीतच खड्डे पडण्याची शक्यता वाहनधारक व्यक्त करीत आहेत. यामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग होऊ नये व रस्ता अधिक काळ टिकावा यासाठी संबंधित यंत्रणेने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.
हमदापूर मार्गावर जीवघेणे खड्डे
सेवाग्राम ते हमदापूर मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली अआहे. दोन मोठे खड्डे मात्र जीवावर बेतणारे ठरत आहेत. अपघात झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार काय, असा संतप्त प्रश्न वाहन चालक उपस्थित करीत आहेत.
सेवाग्राम ते हमदापूर मार्गावर वाहतूक वाढली आहे. रात्री ऊशीरापर्यंत लहान-मोठी वाहने ये-जा करीत असतात. या रस्त्यावर पावलोपावली खड्डे आणि ऊखडलेली गिट्टी, उंचवटे तथा दबलेला रस्ता यामुळे वाहन चालविने कठीण झाले आहे. यात खोलगट खड्ड्यांची भर पडली आहे. श्रीकांत राऊत यांच्या शेताजवळ दोन खड्डे आहे. एक मध्यभाती असून दिसत नाही. अपघात होऊ नये म्हणून त्यात दगड टाकले आहेत. वळणावर लघू पाटबंधारे विभागाने रस्त्यामधून ढोला टाकून पाटसऱ्यांचे पाणी शेतात नेले. रस्त्याच्या बाजूने ढोला फुटून मोठे भगदाड पडले. रोड लहान व वाहनांची संख्या अधिक आहे. यामुळे वाहन चालविणे धोक्याचे झाल्याने बांधकाम विभागाने लक्ष देत कार्यवाही कराी, अशी मागणी वाहन चालक व नागरिक करीत आहेत.
अल्पावधीत खड्ड्यांची शक्यता
हिंगणी ते शिवणगाव रस्त्यावर प्रारंभी डांबराचा शिडकावा केला जात आहे; पण ते डांबर आहे की आॅईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय चुरीचाच अधिक वापर होत असल्याने या रस्त्याला अल्पावधीतच खड्डे पडण्याची शक्यता वाहनधारक तथा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे बांधकाम विभागाने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.