शिबिरातून नागरिकांचे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:33 PM2019-07-30T23:33:55+5:302019-07-30T23:35:28+5:30
पूर्वी शेतकऱ्यांना सातबारासाठी शासनदरबारी चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता शासनाने समाधान शिबिराच्या माध्यमातून राज्यातील दीन, दलित, गरीब, शेतकरी, मजूर अशा प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजनेची माहिती होऊन योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पूर्वी शेतकऱ्यांना सातबारासाठी शासनदरबारी चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता शासनाने समाधान शिबिराच्या माध्यमातून राज्यातील दीन, दलित, गरीब, शेतकरी, मजूर अशा प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजनेची माहिती होऊन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. नागरिकांना एकाच दिवशी विविध योजनांचे दाखले व लाभ देण्यात येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होते, असे प्रतिपादन उद्योग, खनीकर्म व अल्पसंख्याक राज्यमंत्री अतुल सावे यांनी केले.
स्थानिक विकास भवनात जिल्हा प्रशासनाच्यावतीने समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर, नियोजन समिती सदस्य जयंत कावळे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिपसिह ठाकूर, जि.प. सभापती जयश्री गफाट, सोनाली कलोडे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष मनोज तरारे, हरीश पारिसे, प्रशांत बुरले, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार प्रीती डुडुलकर, महेद्र सोनवने, जि. प. सदस्य नुतन राऊत यांची उपस्थिती होती. देशात महाराष्ट्र उद्योग निर्मिती मध्ये तिसºया क्रमांकावर असून राज्यात गेल्या साडेचार वर्षात १९ नवीन उद्योग निर्माण करण्यात आले आहे. या उद्योगामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यशासनाने अल्पसंख्यांकाच्या विकासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयाची तरतुद केली असून अल्पसंख्याकांना मोफत शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे यावेळी सावे म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांनी आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ मिळावा यासाठी आयुष्यमान भारत योजना सुरु केली आहे. देशातील आतापर्यंत १० कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर बोलतांना म्हणाले की, दरवर्षी ३० जुलै रोजी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त वर्धा मतदार संघात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना विविध योजनेची माहिती देऊन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत १५ शेतक ऱ्यांच्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्यात आल्या आहे. वर्धा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना विविध योजनेचा २५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. तसेच ११८ लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. वर्धा शहरातील अल्पसंख्याक वस्ती असलेल्या जाकिर हुसेन कॉलनीतील नागरिकांची ४० वषार्पासून प्रलंबित असलेली क प्रत ची मागणी पूर्ण करण्यात आल्याचेही यावेळी आमदार भोयर यांनी सांगितले.
यावेळी कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर, जिल्हा परिषदच्या सभापती जयश्री गफाट यांनीही मार्गदर्शन केले.
आज झालेल्या समाधान शिबिरात जात प्रमाणपत्र, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, आपसी वाटणी, रस्त्याचे परवाणगी पत्र, आखिव पत्रिका, राष्ट्रीय कुंटूब लाभ योजना, फळबाग लागवड, राजश्री शाहू महाराज योजनेचा लाभ व प्रमाणपत्राचे ३५ हजार लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे हस्ते प्राथमिक स्वरुपात १५ लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उत्तम दिघे यांनी केले तर आभार तहसिलदार प्रीती डुडुलकर यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक, विविध योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.