कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 11:55 PM2018-09-16T23:55:12+5:302018-09-16T23:55:51+5:30

एक महिन्यांपासून नजीकच्या दहेगाव (गोसावी) येथे घरगुती व शेतातील वीज पुरवठा कमी दाबाचा होत असल्याने शेतातील वीज पंप व घरगुती विद्युत उपकरणे कुचकामी ठरत आहे.

Citizen suffers for low-pressure power supply | कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त

कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त

Next
ठळक मुद्देअधिकारी करतात ग्रामस्थांना शिवीगाळ : सहायक अभियंत्याच्या खुर्चीवर ठेवले बेशरमचे झाड

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : एक महिन्यांपासून नजीकच्या दहेगाव (गोसावी) येथे घरगुती व शेतातील वीज पुरवठा कमी दाबाचा होत असल्याने शेतातील वीज पंप व घरगुती विद्युत उपकरणे कुचकामी ठरत आहे. अनेकदा केळझरचे वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता यांच्याकडे दहेगाव वासियांनी तक्रारी केल्या. परंतु काहीच उपयोग झाला नाही. यामुळे त्रस्त झालेल्या दहेगावच्या नागरिकांनी शनिवारी दुपारी केळझर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. कार्यालयात सहायक अभियंता जीवतोडे हजर नव्हते. बराच वेळ प्रतीक्षा केल्यावरही ते हजर न झाल्याने शेवटी वैतागून दहेगावच्या नागरिकांनी त्यांच्या खुर्चीवर बेशरमचे झाड ठेवून त्यांच्या सदोष कार्यप्रणालीचा निषेध केला.
त्यानंतर काही वेळाने सहायक अभियंता जीवतोडे कार्यालयात आले असता संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी दोन महिन्यांपासून सुटीवर असलेल््या लाईनमन गाडेकर यांची बदली करण्यात यावी. तसेच गावातील शेतातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यास लाईनमनशी संपर्क केल्यावर ते अश्लिल भाषेत शिवीगाळ करून नागरिकांना धमकावित असतात अशी तक्रार नागरिकांनी केली. निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी चे संचालक संदीप वाणी गजानन चौधरी, किशोर गलांडे, योगेंश खाडे, प्रमोद कावळे, सतीश महाबुधे, सुनील पाटील, गजानन कोल्हे, सुनील रूईकर, अशोक गलांडे, निलेश मसराम, योगेश पाटील, विनोद ठाकरे, वैभव वाणी मारोतराव ठाकरे, विजय देवतळे, अनिल राणा, मोहन कावळे यांच्यासह मोठ्या संख्येने दहेगाव (गोसावी) येथील शेतकरी व गावकरी उपस्थित होते. दहेगाव गोसावी भागात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी विहीरी खोदण्यात आल्या आहेत. यातून शेतीला ओलीताची सोय केली जाते. महावितरण केंद्राकडून कमी दाबाचा वीज पुरवठा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे शेती सिंचन अडचणीत आले आहे. लाईनमन शेतकºयांना व्यवस्थित सेवा देत नसल्याने त्यांच्या प्रती रोष वाढला आहे.
ग्राहकांना माराव्या लागतात सेलूला फेऱ्या
केळझर- येथील वीज भरणा केंद्रावर वीज देयक भरण्याकरिता जाणाºया ग्राहकांना आल्या पावली परत जावे लागते. कारण वीज वितरण कंपनीचे दोषपूर्ण सॉफ्टवेअर याला कारणीभूत ठरले आहे. वीज बिल भरणा केंद्रावर वीज बिल भरण्याकरिता गेलेल्या वीज ग्राहकांना देण्यात आलेल्या विद्युत देयकावरील भरावयाची मूळ रक्कम व देयक भरणा केंद्राच्या संगणकावर दर्शविण्यात येत असलेली रक्कम यात तफावत येत असल्याने सदर विद्युत देयक संगणक स्वीकारत नाही. त्यामुळे ग्राहकाना वीज देयक घेवून येथील सहायक अभियंता कार्यालयात यावे लागते. येथे त्यावर हस्तलिखीत दुरूस्ती करून सदर वीज देयक सेलू येथे भरण्यास पाठविल्या जाते. त्यामुळे ग्राहकांना अकारण वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. यात ग्राहकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. तरी वीज वितरण कंपनीने हा घोळ दुरूस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

पोहणा- गेल्या पाच महिन्यांपासून रोहित्र बदलवूनही विद्युत पुरवठा सुरू न केल्यामुळे शेतकºयांची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहे. वीज वितरण कंपनीच्या पोहणा कार्यालयांतर्गत हिवरा-बोपापूर शिवारातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मोटर पंपासाठी विद्युत पुरवठ्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आली. प्रयत्नाअंती दिवाकर नासरे यांच्या शेतात परिसरातील शेतकऱ्यांना वीजपुरवठ्यासाठी रोहित्र बसवून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विद्युत खांब टाकून तारा सुद्धा ओढण्यात आल्या. वीजपुरवठा सुरू होणार व आपण ओलीत करू या उद्देशाने अनकांनी विद्युत पंप सुद्धा बसविले. केवळ विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी नसल्या कारणाने शेतकऱ्यांना ओलितापासून वंचित राहावे लागत आहे.

Web Title: Citizen suffers for low-pressure power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज