भारनियमनाच्या विरोधात नागरिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:28 PM2017-10-06T23:28:17+5:302017-10-06T23:28:29+5:30

तालुक्यातील काही भागात १६ तासाचे भारनियमन केले जात आहे. याचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे.

 Citizens aggressive against weightlifting | भारनियमनाच्या विरोधात नागरिक आक्रमक

भारनियमनाच्या विरोधात नागरिक आक्रमक

Next
ठळक मुद्देविद्युत देयक न भरण्याचा निवेदनातून अधिकाºयांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील काही भागात १६ तासाचे भारनियमन केले जात आहे. याचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर जनजीवन विस्कळीत झाले असल्याचा आरोप करीत तात्काळ सुरू केलेले भारनियमन बंद करा अन्यथा आम्ही विद्युत देयके अदा करणार नाही, असा इशारा महावितरणच्या अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून तालुका सरपंच संघटनेचे दिला आहे.
वेळी-अवेळी विद्युत पुरवठा खंडित केल्या जात असल्याने तालुक्यातील अनेक गावातील पाणी पुरवठा योजना प्रभावीत झाली आहे. घागर-घागर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर भारनियमनामुळे ग्रामीण भागातील गव्हाचे पीठ करणाºया चक्की पासून ते शेतीच्या ओलिताची कामे ठप्प पडत आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे दिवस असून विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने त्यांनाही याचा चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. शहरी भागात २४ तास विद्युत पुरवठा दिल्या जातो. तर ग्रामीण भागात १६ तासाचे भारनियमन होत आहे. हा प्रकार ग्रामीण जनतेवर अन्याय करणारा असून तात्काळ भारनियमन बंद करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील जनतेला सवताची वागणूक दिली जात आहे. येत्या काही दिवसांत निवेनाद्वारे करण्यात आलेल्या मागणीवर विचार न झाल्यास भारनियमन बंद होईस्तोवर महावितरणकडून दिल्या जाणारे विद्युत देयक तालुक्यातील नागरिक करणार नाही, असा इशाराही निवेदनातून महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आला आहे. सदर निवेदन सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष निखिल कडु यांच्या नेतृत्त्वात महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आले.
तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याच्या मागणीच्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यलय वर्धा यांना तर उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना धमेंद्र राऊत, बाळा सोनटक्के, दिनेश डेहनकर, अश्विन शेंडे, अरूण मांडवकर, रोशन राऊत, जीतेश मात्रे, अशोक कठाणे, योगेश सरोदे, रामु मसराम, प्रशांत भडके, पुरुषोत्तम ढोले, सागर ठाकरे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, शेतमजुर व परिसरातील गावांमधील महिला-पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Citizens aggressive against weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.