रामनगर पोलीस कचेरीवर बुधवारी धडकणार नागरिकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:48 PM2018-05-28T22:48:07+5:302018-05-28T22:48:07+5:30

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून आपल्याला तुरंगात डांबले. हा प्रकार निंदनिय असून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवार ३० मे रोजी स्थानिक आर्वी नाका चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे.

Citizens' Front will be attacked by the Ramnagar police on Wednesday | रामनगर पोलीस कचेरीवर बुधवारी धडकणार नागरिकांचा मोर्चा

रामनगर पोलीस कचेरीवर बुधवारी धडकणार नागरिकांचा मोर्चा

Next
ठळक मुद्देनिहाल पांडे : सचिन यादव यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करू

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून आपल्याला तुरंगात डांबले. हा प्रकार निंदनिय असून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवार ३० मे रोजी स्थानिक आर्वी नाका चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा रामनगर पोलीस कचेरीवर धडक देणार असून यावेळी आपण सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करणार आहो, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांनी दिली.
निहाल पांडे पुढे म्हणाले, स्थानिक तुकाराम वॉर्ड परिसरात काहींनी २३ मे रोजी रात्रीला हिवंज नामक तरुणाशी वाद केला. यावेळी हिवंज नामक तरुण जखमी झाला. या प्रकरणात आपला कुठलाही संबंध नसताना रामनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी आपल्यावर गुन्हे दाखल करून आपणास तुरुंगात डांबले. इतकेच नव्हे तर याप्रसंगी यादव यांनी आपल्याला श्रीमुखात लगावत जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली. इतक्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी आपल्याला ताब्यात घेतल्यानंतर साधे कुटुंबियांनाही फोन करू दिला नाही. तसेच अटक करून तुरुंगात डांबल्यानंतर उपाशी ठेवत साधे पाणीही पिण्यासाठी दिले नाही. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निहाल पांडे यांचा या प्रकरणात कुठलाही संबंध नसल्याबाबतचे शपथपत्र न्यायालयात तक्रारकर्ता हिवंज यांनी सादर केले आहे.
इतकेच नव्हे तर पोलीस अधीक्षकांनाही घटनेची वास्तविकता तक्रारकर्त्याने स्वत: सांगितली आहे. यादव यांच्याकडून करण्यात आलेले मारहाण व जीवेमारण्याची धमकी हा प्रकार निंदनिय आहे. माझ्या जीवाला यादव यांच्याकडून धोका असून त्यांच्याविरोधात आपण ३० रोजी मोर्चादरम्यान पोलिसात तक्रार सादर करणार आहो, असेही यावेळी निहाल पांडे यांनी सांगितले.
घरातून रोख व साहित्य नेले - सेलूकर
स्थानिक साईनगर येथील रहिवासी असलेल्या विशाल सेलूकर यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. सेलुकर म्हणाले की, आपल्यावर पत्नीने पोटगीसाठी खटला दाखल केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना पत्नी घरी आली. ती घरी राहत असताना अचानक एक दिवस वाद झाला. त्याबाबतची तक्रार माझ्या पत्नीने रामनगर पोलिसात दाखल केली. त्यानंतर आपल्या घरी एपीआय यादव यांनी आपल्या चमुसह तसेच माझ्या पत्नीसह येत घरातील साहित्य व रोख पत्नीसमक्ष नेली. त्यानंतर आपण या प्रकरणी योग्य कार्यवाही व्हावी म्हणून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्या तक्रारीची प्रत आपण रामनगर ठाण्यात देण्यासाठी गेलो असता आपल्याला एपीआय यादव यांनी धाकदपट केली. आपणही यादव यांच्या मनमर्जी कामाचे पीडित ठरलो असल्याचे यावेळी विशाल सेलूकर यांनी सांगितले.

Web Title: Citizens' Front will be attacked by the Ramnagar police on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.