नाल्याच्या दैनावस्थेने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:37 PM2017-10-29T23:37:05+5:302017-10-29T23:37:20+5:30
स्थानिक प्रभाग क्रं. ३ मधील मोठा नाला गत अनेक वर्षांपासून पाहिजे तसा स्वच्छ करण्यात आला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक प्रभाग क्रं. ३ मधील मोठा नाला गत अनेक वर्षांपासून पाहिजे तसा स्वच्छ करण्यात आला नाही. सध्या या नाल्यात ठिकठिकाणी कचरा साचून असून कुजलेल्या कचºयामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून रहिवाशांची समस्या लक्षात घेता पालिका प्रशासनाने तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
प्रभाग क्रं. ३ मधील इंदिरावाडी, लेंडीपूरा, मातंगपूरा हा परिसर कष्टकºयांची वसाहत म्हणून ओळखल्या जातो. येथून मोठा नाला गेला असून तो पावसाळीपूर्वी नियोजनात वर्धा पालिकेच्यावतीने स्वच्छ करणे क्रमप्राप्त असते. परंतु, गत काही वर्षांपासून सदर नाल्यातील गाळ पाहिजे तसा काढण्यात न आल्याने सध्या ठिकठिकाणी नाल्यातील पाणी अडत आहे. इतकेच नव्हे तर नाल्यात कचरा कुजत असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
सदर नाल्याची व्यवस्थित पणे स्वच्छता करण्यात यावी यासाठी तेथील रहिवाशांनी काही लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासनाला माहिती दिली. परंतु, लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप या भागातील नागरिक करतात. पालिकेकडे नागरिकांनी विचारणा केली असता पावसाळ्याच्या सुरूवातीला नाला स्वच्छ करण्यासाठी कंत्राट देण्यात आला. कंत्राटदार नाला स्वच्छ करेल असे नागरिकांना सांगण्यात आले. मात्र, पावसाळा संपायला आला असला तरी कंत्राटदार नाला स्वच्छ करण्यासाठी येथे फिरकलाच नसल्याचे नागरिक सांगतात. नाल्याच्या अडणाºया सांडपाण्यात दिवसेंदिवस डासांची निर्मिती होत असल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आदी आजारांना आमंत्रण मिळत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी प्रभाग क्रं. ३ मधील नाला स्वच्छ करण्यासाठी तात्काळ योग्य पाऊले उचलण्याची मागणी आहे.
कीटकजन्य आजाराला मिळतेय निमंत्रण
प्रभाग तीन मधील नाल्याची स्वच्छता न करण्यात आल्याने ठिकठिकाणी सांडपाणी साचत आहे. यात दिवसेंदिवस डासांची निर्मिती होत असून हा प्रकार डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आदी किटकजन्य आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे. एखादी रोगराई येण्यापूर्वीच रोगराईला आमंत्रण देणारा नाला त्वरित स्वच्छ करण्याची नागरिकांची मागणी आहे. सदर मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.