विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण
By admin | Published: July 6, 2015 02:14 AM2015-07-06T02:14:02+5:302015-07-06T02:14:02+5:30
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले तरीही अघोषित भारनियमन होत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहे.
अघोषित भारनियमन : उपकरणे ठरतात शोभेची
तळेगाव (श्या.पं.) : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले तरीही अघोषित भारनियमन होत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहे. वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीला तर बऱ्याचदा वीजपुरवठा खंडित होत असल्यासने घरातील पंखा व अन्य उपकरणे शोभेची ठरतात. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वीज वितरण कंपनीकडून विद्युत ग्राहकांना वीज आकारणीत वाढ करण्यात कोणतीच कसूर नसते. मात्र त्या प्रमाणात सुविधा पुरविण्यात दक्षता बाळगली जात नसल्याची ओरड ग्राहकातून होत आहे. ग्रामीण भागात चाम्गली सेवा दुरापास्त झाल्याचे वास्तव पहायला मिळत आहे. तळेगाव वीज कार्यालयात तक्रार देण्यास गेले असता याकडे कर्मचारी सपशेल दुर्लक्ष करतात. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
येथील वरिष्ठांचे कनिष्ठ कर्मचाऱ्यावर नियंत्रण नसल्याचे दिसून येते. याचा नाहक त्रास ग्राहकांना सोसावा लागतो. भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)