संविधानाच्या सन्मानार्थ नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:49 PM2018-08-17T23:49:09+5:302018-08-17T23:50:27+5:30

दिल्ली येथील जंतर-मंतर येथे जातीयवादी व राष्ट्रविरोधी काही समाजकंटकांनी जाहीरपणे प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणाबाजी केल्या. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ व भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ ......

Citizens in the honor of the Constitution on the road | संविधानाच्या सन्मानार्थ नागरिक रस्त्यावर

संविधानाच्या सन्मानार्थ नागरिक रस्त्यावर

Next
ठळक मुद्देदिल्लीतील ‘त्या’ घटनेचा नोंदविला निषेध : मुख्य मार्गाने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे जातीयवादी व राष्ट्रविरोधी काही समाजकंटकांनी जाहीरपणे प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणाबाजी केल्या. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ व भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ शुक्रवारी विविध संघटनांनी एकत्र येत शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
भारतीय संविधान हे देशातील सर्व जाती, धर्म, पंथ व संप्रदायाच्या नागरिकांना मुलभूत अधिकार, समान न्याय, संपुर्ण संरक्षण तसेच व्यक्तीच्या सन्मानाची हमी देते. संविधान हे भारतातील सर्व नागरिकांच्या हिताचे रक्षण करणारा मुलभूत व सर्वाेच्च कायदाच आहे. लोकशाहीच्या या प्राणतत्त्वाला कोणत्याही व्यक्ती, समुह व संघटीत शक्तीच्या मार्फत पोहोचविण्याचा किंवा संपविण्याचा थोडा जरी प्रयत्न केल्यास तो देशद्रोहाचा गुन्हा ठरतो. दिल्ली येथील घटना निंदनिय असून या प्र्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. शिवाय ज्या संघटनांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी केली. मोर्चात आंबेडकरी जनतेसह विविध परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Citizens in the honor of the Constitution on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा