वर्धा जिल्ह्यातील पंचाळा गावातील नागरिकांनी अद्याप नळ पाहिलेला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 02:19 PM2019-03-05T14:19:30+5:302019-03-05T14:26:52+5:30
जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यातील पंचाळा या गावातील नागरिकांनी आपल्या गावात अजून नळ पाहिलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यातील पंचाळा या गावातील नागरिकांनी आपल्या गावात अजून नळ पाहिलेला नाही. पोरगव्हान, पंचाळा, झाडगाव, पांढुर्णा ४ गावे मिळुन गटग्रामपंचायत आहे. यातीलच एक गाव आहे पंचाळा. येथे गावकऱ्यांना पाणी भरायला एक सार्वजनिक विहीर आहे. त्याच विहिरीवरुन पूर्ण गाव पायपीट करुन पाणी भरते. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी आता खालावलेली आहे.
या गावातील विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी जातात. तेथे असलेल्या कॅनॉलमध्ये अंघोळ करतात. कारण घरी अंघोळीला पुरेसे पाणी नसते आणि घरातील पाणी जपून वापरावे लागते.
यासंदर्भात सरकारने लक्ष घालून पाण्याची व्यवस्था करावी अशी येथील नागरिकांनी मागणी आहे.