पाण्यासाठी नागरिकांनी कोंडून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:37 PM2018-05-14T22:37:56+5:302018-05-14T22:37:56+5:30

ग्रामपंचायत अंतर्गत नळयोजनेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो; पण गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गत काही महिन्यापासून नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. यामुळे पाणी मिळण्याची मागणी करण्याकरिता ग्रामपंचायतीत गेलेल्या येथील नागरिकांनी पाण्याकरिता स्वत:ला कार्यालयात कोंडून घेतले. सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ माजली.

Citizens shut down for water | पाण्यासाठी नागरिकांनी कोंडून घेतले

पाण्यासाठी नागरिकांनी कोंडून घेतले

Next
ठळक मुद्देतळेगाव ग्रामपंचायतीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत) : ग्रामपंचायत अंतर्गत नळयोजनेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो; पण गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गत काही महिन्यापासून नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. यामुळे पाणी मिळण्याची मागणी करण्याकरिता ग्रामपंचायतीत गेलेल्या येथील नागरिकांनी पाण्याकरिता स्वत:ला कार्यालयात कोंडून घेतले. सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ माजली.
गावकऱ्यांना आठवड्यातून एकच दिवस पाणी मिळते. यामुळे या भागातील नागरिक आज सकाळी ग्रामपंचायत सदस्य सुनील मोहेकर यांच्या नेतृत्त्वात एकत्र आले. यावेळी जि.प. सदस्य अंकीता होले याही उपस्थित झाल्या. त्यांनी ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करू असे म्हणताच गावकºयांकडून त्याला विरोध झाला. या समस्येवर तात्पुरता उपाय नको तर ती कायमस्वरूपी मार्गी लावा, असे म्हणत सुनील मोहेकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी ग्रा.प. कार्यालयावर धडक दिली.
येथे गावकºयांच्या समस्या ऐकूण घेण्याकरिता एकही पदाधिकारी आला नसल्यामुळे शेवटी नागरिकांनी स्वत:ला ग्रा.प. कार्यालयात कोंडून घेतले. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाही, अशी भूमिका गावकºयांनी घेतली. पदाधिकाºयांची चौकशी केली असता सरपंच कारंजाला लग्नसमारंभात, पं.स. सदस्य तथा उपसभापती चंद्रपूरला असल्याचे सांगितले. अशावेळी तळेगाव ग्रा.पं. चे सचिव हे सुद्धा सुट्टीवर असल्याचे समोर आले. यामुळे न्याय कोणाला मागावा असा पेच नागरिकांसमोर पडला. सध्या तळेगाव ग्रा.प.ला प्रभारावर असलेले राठोड हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी तुम्हाला मुबलक पाणीपुरवठा करू या आश्वासनावर ग्रामस्थ कुलूप उघडून बाहेर आले.
एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे अपव्यय
पाण्यासाठी वॉर्ड क्रमांक ६ चे ग्रामस्थ आंदोलन करीत आहे. तर याच गावातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये सरकारी नळ हा भरदुपारी १२ वाजेपर्यंत धो धो वाहत होता. त्यामुळे येथे नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले.

गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन लिकेज आहे. तो लिकेज शोधण्याकरिता गत दोन दिवसापासून आठ मजूर कार्यरत आहे. तो लिकेज सापडताच पाणी पुरवठा हा सुरळीत होईल.
- सुनीता जोरे, सरपंच

सरपंच व सचिवाला नेहमी वॉर्डाबद्दल सांगतो की पाणीसमस्या आहे. पण माझ कोणीच ऐकत नसून सचिव सरपंच हे म्हणतात की आम्हाला सर्व समजते. अशावेळी न्याय कोणाला मागावा
- सुनील मोहेकर, ग्रा.पं. सदस्य वॉर्ड क्र.६

पाणी समस्येबाबत सरपंचाना फोन लावला असता तुमच्या पाण्याची व्यवस्था तुम्हीच करा असे म्हटले.
- मनीषा गाखरे, त्रिवेणी कालमु, ग्रामस्थ वॉर्ड क्र. ६

Web Title: Citizens shut down for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.