शास्त्रीय दृष्टिकोनातून सौंदर्यीकरण व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:22 PM2018-02-24T22:22:50+5:302018-02-24T22:22:50+5:30

मी आश्रमची वकिली करणार नाही; पण पवनार येथील धाम नदीला खडकाचे सौंदर्य लाभले आहे. ते इतरत्र दिसत नाही.

Classical approach to beautification | शास्त्रीय दृष्टिकोनातून सौंदर्यीकरण व्हावे

शास्त्रीय दृष्टिकोनातून सौंदर्यीकरण व्हावे

Next
ठळक मुद्देराजेंद्र सिंग : वादावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत भवनात बैठक

ऑनलाईन लोकमत
पवनार : मी आश्रमची वकिली करणार नाही; पण पवनार येथील धाम नदीला खडकाचे सौंदर्य लाभले आहे. ते इतरत्र दिसत नाही. नदीचे पाणी आटले असले तरी जीव-जंतु खडकाखालील ओलाव्यामुळे जिवंत राहतात. त्यांच्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. मुरूम टाकून नदी बुजविण्याचा प्रयत्न केला तर तिचा नाला होईल. यामुळे तांत्रिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून सौंदर्यीकरण व्हावे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा निर्माण करू नये, असे मत प्रसिद्ध जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.
सेवाग्राम-पवनार विकास आराखड्यांतर्गत धामतिरावर आश्रम परिसराकडून २१ कोटींच्या कामाला प्रारंभ झाला. यात दोन हजार ट्रक मुरूम टाकून नदी बुजविली जात आहे. गुजरातच्या साबरमती तिरावर झालेल्या सौंदर्यीकरणाच्या धर्तीवर येथे सौंदर्यीकरण होत आहे. यासाठी नदी बुजविणे व खडक फोडण्यास आश्रमवासी विरोध करीत आहे. यामुळे आश्रमवासी व ग्रामस्थ यांच्यात तात्विक वाद निर्माण झाला आहे. ग्रामस्थांना विकास हवा आहे; पण कामाच्या पद्धतीला आश्रमवासीयांचा विरोध आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ग्रा.पं. भवन येथे बैठक घेण्यात आली. यवेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.
सरपंच गांडोळे यांनी या सौंदर्यीकरणामुळे येथे येणाºया पर्यटकांची संख्या वाढेल. स्थानिकांना रोजगारही मिळेल. मूर्ती विसर्जन कुंड, नदीला मिळणाºया नाल्यावर बसणारे बायो फिल्टर यामुळे नदीचे पाणी दूषित होणार नाही. जलशुद्धीकरणावर होणारा अवास्तव खर्चही कमी होईल. गांधी-विनोबा विचारसरणीय धूरिणींचा यावर आक्षेप असेल तर चर्चेतून काही बदल करून हा प्रश्न मार्गी लावता येईल. प्रकल्प होऊच नये, ही अंतिम भूमिका असेल तर तोडगा निघणार नाही, असे सांगितले. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता क्षीरसागर यांनी डॉ. राजेंद्र सिंग व सहकाºयांना प्रकल्प समजावून सांगताना हा प्रकल्प पर्यावरणपूरक राहील याची खात्री दिली. प्रकल्प व्यवस्थापक हासिम खान यांनी आपल्या सूचना, बदलांचा विचार करून तो प्रकल्पात कसा समाविष्ट करता येईल, हे ठरविले जाईल, असे सांगितले. चर्चेत सहभागी करुणा बहन यांनी सृष्टीच्या रचनेला छेद देऊ नका. यामुळे ºहास होईल, असे सांगितले.

Web Title: Classical approach to beautification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.