‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ अभियान
By Admin | Published: October 8, 2014 11:29 PM2014-10-08T23:29:36+5:302014-10-08T23:29:36+5:30
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शाळांमध्ये ‘स्वच्छ भारत, स्वच्छ अभियान’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ते अभियान राज्यातील प्रत्येक शाळा,
शाळांचा सहभाग : विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना
सुरेंद्र डाफ - आर्वी
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शाळांमध्ये ‘स्वच्छ भारत, स्वच्छ अभियान’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ते अभियान राज्यातील प्रत्येक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात ३१ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळेत हे उपक्रम राबविण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने सर्व शाळांना केल्या आहे.
‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ या अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये स्वच्छतेविषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत शिक्षण विभागाचे अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, पालक, शालेय कर्मचारी व विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना इतरांना स्वच्छ गाव आरोग्य विषयक नाविण्यपूर्ण उपक्रमावी निवड व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांप्रती शालेय व विद्यालयीन शिक्षणाची भूमिका व त्याचा विद्यार्थ्यांच्या विकासगुणाचा दर्जा कायम राखून आदर्श कलागुणांची जोपासना विद्यार्थ्यांमध्ये करण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात यावे, यातून विद्यार्थ्यांना पोषक व उत्साहवर्धक तसेच शालेय उपस्थितीत विद्यार्थ्यांची वाढ होईल हा शालेय उपक्रमाचा एक भाग म्हणून दर्जेदार शिक्षण घेण्यामध्ये या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होईल हा हेतू या स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय अभियाना समोर ठेवण्यात आला आहे.
या अभियानात शालेय स्तरावर दररोज विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात आरोग्य विषयक शपथ, शिक्षणाची पालखी, स्वच्छता ज्ञानयात्रा परिक्रमा, स्वच्छतेवर विद्यार्थ्यांची भाषणे शालेय परिसर स्वच्छता, निबंध स्पर्धा, मेळावे, शाळामध्ये स्वच्छतागृहे, पाण्याची उपलब्धता, मेळावे, निबंध स्पर्धा, स्थानीक कलाकारांच्या माध्यमातून जनजागृती, शैक्षणिक प्रदर्शन, कार्यालयीन स्वच्छता, हँडवॉश दिन आदी बाबींचा ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या अभियानात समावेश करण्यात आला आहे. यामुळे शाळांशाळांत यानुसार काम सुरू आहेत.