बसस्थानकात अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:42 PM2018-07-07T22:42:54+5:302018-07-07T22:43:40+5:30

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा बसस्थानकात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. बसस्थानक परिसर नेहमीच स्वच्छ रहावा यासाठी रापमने खासगी कंपनी नियुक्त केली असली तरी वर्धा बस स्थानकात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.

The climax of indigestion in the bus station | बसस्थानकात अस्वच्छतेचा कळस

बसस्थानकात अस्वच्छतेचा कळस

Next
ठळक मुद्देप्रवाशांना दुर्गंधीचा त्रास : व्यवस्थापकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा बसस्थानकात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. बसस्थानक परिसर नेहमीच स्वच्छ रहावा यासाठी रापमने खासगी कंपनी नियुक्त केली असली तरी वर्धा बस स्थानकात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. यामुळे सदर खासगी कंपनीच्या कार्यप्रणालीवर नागरिकांसह प्रवाशांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याकडे रापमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत सदर खासगी कंपनीला योग्य सुचना देण्याची गरज आहे.
जिल्ह्याचे स्थळ असल्याने वर्धा शहरात दररोज विविध कामानिमित्त अनेक शासकीय कार्यालयात ग्रामीण भागातील नागरिक येतात. मात्र, ज्या ठिकाणी वर्धा शहरात येताच ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रथम पाऊल पडते तोच वर्धा बस स्थानकाचा परिसराची दैना पाहून नागरिकांकडून सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वर्धा बस स्थानक परिसरात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे कायम असल्याचे दिसून येते. शिवाय पावसामुळे ओला झालेला कचरा गत काही दिवसांपासून त्याच परिसरात कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
ज्या खासगी कंपनीला वर्धा बस स्थानक नेहमीच स्वच्छ रहावे यासाठीचा कंत्राट दिला आहे, त्याच कंपनीचे सुमारे पाच कर्मचारी तेथे दररोज कार्यरत केले जातात; पण तेही आपल्या मनमर्जीनेच काम करीत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य राहत असल्याचे परिसरातील व्यावसायिक सांगतात. प्रवाशांचे सुदृढ आरोग्य हा हेतू केंद्रस्थानी ठेवून बसस्थानक व्यवस्थापक व रापमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.

वर्धा बसस्थानक नेहमीच स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी एका खासगी कंपनीला जिल्ह्यातील सर्वच बसस्थानक स्वच्छ ठेवण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. वेतन न मिळाल्याने सदर कंपनीच्या कर्मचाºयांनी गत काही दिवस त्यांचे काम केले नाही. त्यामुळे कदाचित परिसरात घाणीचे साम्राज्य असेल. वेळीच बसस्थानक स्वच्छ करण्याच्या सुचना देण्यात येईल.
- चेतन हासबनीस, विभाग नियंत्रक, रा.प.म. वर्धा.

Web Title: The climax of indigestion in the bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.