कर्मचाऱ्यांच्या कामाची ‘घडी’ विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:00 AM2020-11-25T05:00:00+5:302020-11-25T05:00:19+5:30

सकाळी १० वाजता या कार्यालयात फेरफटका मारला असता महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय कुलूपबंदच असल्याचे दिसून आले. तर  गट क्षिक्षण अधिकारी कार्यालयात दोनच कर्मचारी उपस्थित होते. यात बुचे व माहूरे नामक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर आस्थापना विभागात एकच कर्मचारी हजर होता. व शिपाई उपस्थित होता.

The ‘clock’ of staff work whistled | कर्मचाऱ्यांच्या कामाची ‘घडी’ विस्कटली

कर्मचाऱ्यांच्या कामाची ‘घडी’ विस्कटली

googlenewsNext
ठळक मुद्देसेलू पं.स.तील प्रकार : कामकाजावर होतोय परिणाम, नागरिकांना त्रास

  लोकमत न्यूज नेटवर्क 
सेलू (घोराड) : तालुक्यात असलेल्या पंचायत समिती कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या कामाची घडी विस्कटली असून याचा कामकाजावर मोठा परिणाम होतो आहे. त्यामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मंगळवारी  सकाळी कार्यालय उघडण्याच्या वेळी या कार्यालयातील काही विभागाचे कुलूपही उघडल्या गेले नव्हते. तर काही विभागाचे दरवाजे उघडे असले तरी सकाळी  १० वाजता बोटावर मोजण्या इतपतही कर्मचारी हजर नव्हते. काही अधिकारी कार्यालयातच आले नव्हते. येथे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व बहुतांश कर्मचारी वर्धा व नागपूर येथून ये जा करतात.
सकाळी १० वाजता या कार्यालयात फेरफटका मारला असता महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय कुलूपबंदच असल्याचे दिसून आले. तर  गट क्षिक्षण अधिकारी कार्यालयात दोनच कर्मचारी उपस्थित होते. यात बुचे व माहूरे नामक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर आस्थापना विभागात एकच कर्मचारी हजर होता. व शिपाई उपस्थित होता. मात्र, कार्यालयीन कामकाजाच्या वेळा पाहता या कार्यालयात  बहुतांश कर्मचारी हे सकाळी १० नंतरच येत असल्याचे चित्र नेहमीचेच असून या लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर लगाम कोण लावणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.  
या कार्यालयात अनेक नागरिक विविध कामासाठी येतात. मात्र, कार्यालयात कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित राहत नसल्याने अनेकांना आल्या पावली परतावे लागत असल्याने नागरिकांना याचा मनस्ताप होतो.
या पंचायत समितीत असणारे कार्यालयात काहीच कर्मचारी वेळेवर येत असून काही कर्मचाऱ्यांना सवलत तर नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. तर शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांचे लेटलतीफ येणे हे नित्याचेच झाले असल्याचा आरोप नागरिकांतून् करण्यात येत आहे.

कार्यालय प्रभारी
 पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रभारी, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रभारी, तर गटशिक्षणाधिकाऱ्यांचा भार प्रभारीच्या खांद्यावर आहे. बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याकडे वर्धा व सेलू चा पदभार असल्याने येथील मुख्य पदे हे प्रभारींच्या खांद्यावर असल्याचे  चित्र आहे.

 

Web Title: The ‘clock’ of staff work whistled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.