बंद उद्योगांचे भूखंड पडीकच

By admin | Published: June 7, 2017 12:32 AM2017-06-07T00:32:38+5:302017-06-07T00:32:38+5:30

जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, कारंजा, देवळी येथे एमआयडीसी आहे. यातील देवळी येथील औद्योगिक वसाहतीची स्थापना सर्वात उशिराने झाली;

The closed industrial plots come out | बंद उद्योगांचे भूखंड पडीकच

बंद उद्योगांचे भूखंड पडीकच

Next

एमआयडीसीची व्यथा : बेरोजगारांना प्लॉट देण्याकडे कानाडोळा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, कारंजा, देवळी येथे एमआयडीसी आहे. यातील देवळी येथील औद्योगिक वसाहतीची स्थापना सर्वात उशिराने झाली; पण हिंगणघाट नंतर सर्वाधिक विकास देवळी येथील एमआयडीसीचा झाल्याचे दिसते. वर्धा एमआयडीसी अद्यापही माघारली असून बहुतांश भूखंड रिक्त वा अकारण खंडरांनी व्यापलेले दिसतात. याकडे लक्ष देत बेरोजगारांना भूखंड उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.
जिल्ह्यातील वर्धा व हिंगणघाट येथील एमआयडीसी जुनी आहे. यानंतर कारंजा येथे मिनी एमआयडीसी तर देवळी येथे औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. वर्धेच्या तुलनेत सध्या वर्धा व हिंगणघाट येथील एमआयडीसीचा विकास झपाट्याने झाल्याचे दिसून येते. वर्धा एमआयडीसीमध्ये उद्योग आहेत; पण बंद उद्योगांचीच संख्या अधिक दिसून येते. वर्धा औद्योगिक विकास महामंडळाचा विकास करण्यात आला आहे. भूखंडांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे; पण योग्य कार्यवाही केली जात नसल्याने बहुतांश भूखंडांवर खंडर उभे असल्याचेच पाहावयास मिळते. बंद उद्योगांनीच औद्योगिक विकास महामंडळातील मोठी जागा बळकावल्याचे दिसून येते. परिणामी, बेरोजगारांना उद्योग सुरू करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथील एमआयडीसीमध्ये ४५० च्या वर भूखंड असताना मोठे उद्योग उभे होऊ शकलेले नाहीत. काही उद्योग सुरू आहेत; पण त्यात बेरोजगारांना विशेष संधी मिळत नसल्याचे वास्तव आहे.
एमआयडीसीत बहुतांश भूखंडांवर घरांची निर्मिती झाली आहे. वास्तविक, नियमानुसार भूखंडाच्या १० टक्के जागेवर उद्योगांचे कार्यालय बांधता येते; पण येथे राहुटीच्या उद्देशाने बंगलेच उभे होत असल्याचे दिसते. दोन सूतगिरण्या आहे; पण एक बंदच आहे. अन्य उद्योगही रखडत सुरू असल्याचे दिसते. मागील कित्येक वर्षांपासून वर्धा एमआयडीसीमध्ये एकही मोठा उद्योग उभा होऊ शकलेला नाही. असे असताना औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र तथा जिल्हा प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसून येत आहे. आताही एमआयडीसीत भूखंडांवर उद्योगांऐवजी घरे बांधली जात असल्याने औद्योगिक वसाहतीचा उद्देश सफल होताना दिसत नाही.

मद्याचे घोट व जुगारासाठी वापर
वर्धा एमआयडीसीमध्ये बहुतांश उद्योग बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. असे असले तरी संबंधितांनी भूखंडांवरील त्यांचा ताबा सोडलेला नाही. परिणामी, बंद पडलेल्या अनेक उद्योगांच्या जीर्ण झालेल्या इमारती एमआयडीसीच्या विकासाला अडसर ठरत असल्याचेच पाहावयास मिळते. औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या खंडरांचा वापर सध्या जुगार खेळणे आणि मद्याचे घोट घेण्याकरिता केला जात असल्याचे मंगळवारी दिसून आले. यामुळे औद्योगिक वसाहतीच्या उपयोगीतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Web Title: The closed industrial plots come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.