मातीवर वाळतात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे कपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:51 PM2018-04-12T23:51:30+5:302018-04-12T23:51:30+5:30
आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर डल्ला मारून विद्यार्थ्यांना वाºयावर सोडल्याचा प्रकार तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील महात्मा ज्योतिबा फुले आदिवासी आश्रम शाळेत बघावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर डल्ला मारून विद्यार्थ्यांना वाºयावर सोडल्याचा प्रकार तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील महात्मा ज्योतिबा फुले आदिवासी आश्रम शाळेत बघावयास मिळत आहे. येथील विद्यार्थ्यांचे कपडे चक्क मातीवर वाळत असून हा प्रकार आदिवासी नेते अवचित सयाम यांनी बघितल्यावर त्यांनी चौकशी करून दोषींवर योग्य कारवाईची मागणी केली आहे.
आदिवासी नेते अवचित सयाम हे दहेगाव येथील शुभांगी उईके हिच्या मृत्यू प्रकरणी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तेथे गेले असता त्यांना येथील आदिवासी आश्रम शाळेतील हा किळसवाना प्रकार दिसून आला. त्यांना शाळा शेजारी असलेल्या खुल्या मैदानात चक्क मातीवर विद्यार्थ्यांचे कपडे वाळत असल्याचे दिसून आले. आदिवासी विभागाकडून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कपडे धुण्यासाठी तर वाळविण्यासाठी निधीची तरतूद करून तो पुरविण्यात येतो; पण या ठिकाणी उघड्यावर कपडे वाळत घालण्याचा प्रकार पाहून आश्रम शाळेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या कपड्यांना मातीचा संसर्ग होऊन चिमुकल्यांच्या आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा असून त्याबाबत आदिवासी नेते अवचित सयाम हे संबंधितांना लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आश्रम शाळेतील वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणीही आहे.