चोरट्याला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 09:59 PM2019-07-03T21:59:13+5:302019-07-03T21:59:33+5:30
चोरीच्या दाखल गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयीत महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या तिनही आरोपींकडून पोलिसांनी १.५३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. संगीता रामा दांडेकर (३२), लक्ष्मी रमेश देवुळकर (३०) दोन्ही रा. यशोदानगर, बोरगाव (मेघे) तर दामोदर सुरेश हिवरे (४४) रा. पवनार असे आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चोरीच्या दाखल गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयीत महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या तिनही आरोपींकडून पोलिसांनी १.५३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. संगीता रामा दांडेकर (३२), लक्ष्मी रमेश देवुळकर (३०) दोन्ही रा. यशोदानगर, बोरगाव (मेघे) तर दामोदर सुरेश हिवरे (४४) रा. पवनार असे आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सौरभ मित्तल यांच्या सेलू येथील गोदामातून १ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सेलू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत असता गोपनीय माहितीच्या आधारे दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकरून पोलिसांनी चोरीचे साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेला एम.एच. ३२ बी. ७६५५ क्रमांकाचा आॅटो जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोेलीस उपनिरीक्षक आशीष मोरखेडे, गजानन लामसे, अविनाश बन्सोड, यशवंत गोल्हर, गोपाल बावनकर, मनिष कांबळे, भारती ठाकरे यांनी केली.