शॉट सर्किटमुळे आग शेतमालाचा कोळसा
By admin | Published: March 4, 2017 12:41 AM2017-03-04T00:41:10+5:302017-03-04T00:41:10+5:30
भवानपूर शिवारात लागलेल्या आगीत सोयाबीन, तूर, चना तसेच थ्रेशर मशीन जळून खाक झाली.
Next
गिरड : भवानपूर शिवारात लागलेल्या आगीत सोयाबीन, तूर, चना तसेच थ्रेशर मशीन जळून खाक झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. यात शेतकरी चंद्रदास कवडू राऊत यांचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.
राऊत हे ठेक्याने शेती करतात. शेतमाल काढण्यासाठी त्यांनी थ्रेशर बोलाविली होती. येथे शॉटसर्कीटने लागलेल्या आगीत १० क्विंटल तूर, ५० क्ंिवटल चना, ५० क्विंटल सोयाबीन, तसेच थ्रेशर मशीन जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस उपनिरीक्षक राठोड, पटवारी देशमुख, ग्रामसेवक जाधव, सचिन वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.(वार्ताहर)