अचानक लागलेल्या आगीत साहित्याचा कोळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:39 PM2018-05-16T23:39:17+5:302018-05-16T23:39:17+5:30

कढईतील उष्म तेलाने अचानक पेट घेतला. बघता-बघता आगीने दुकानातील साहित्य आपल्या कवेत घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांसह नागरिकांनी वेळीच पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बॅचलर रोड भागात घडली.

Coal of Material in a Sudden Fire | अचानक लागलेल्या आगीत साहित्याचा कोळसा

अचानक लागलेल्या आगीत साहित्याचा कोळसा

Next
ठळक मुद्देबॅचलर रोडवरील घटना : व्यावसायिकाचे एक लाखाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कढईतील उष्म तेलाने अचानक पेट घेतला. बघता-बघता आगीने दुकानातील साहित्य आपल्या कवेत घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांसह नागरिकांनी वेळीच पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बॅचलर रोड भागात घडली. आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने वडापाव विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कौस्तुभ शिर्के यांचे एक लाखाचे नुकसान झाले.
बॅचरल रोडवर लोकविद्यालय समोर कौस्तुभ शिर्के यांच्या मालकीचे वडापाव विक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांच्या दुकानात काम सुरू असताना भट्टीवर असलेल्या कढईतील तेलाने अचानक पेट घेतला. तेल पेटल्याचे लक्षात येताच कामगार व इतरांनी दुकानाबाहेर येत आरडा-ओरड केली. दरम्यान, नागरिकांनी घटनेची माहिती रामनगर पोलीस व वर्धा न.प. च्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळ गाठत नागरिकांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत दुकानातील फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाल्याने कौस्तुभ शिर्के यांचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या रामनगर पोलिसांच्या चमूने पंचनामा करीत घटनेची नोंद घेतली आहे.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी
वडापाव विक्रीच्या दुकानाला आग लागल्याची माहिती परिसरात वाºयासारखी पसरली. यामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. रहदारीच्या रस्त्यावरील या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पूढील अनर्थ टळला.

Web Title: Coal of Material in a Sudden Fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग