बोंडअळीच्या नाशासाठी ‘कोरा पॅटर्न’ ठरला लाभदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:44 PM2018-08-11T23:44:37+5:302018-08-11T23:44:54+5:30
बोंडअळीचा प्रकोप रोखण्यासाठी कोरा येथील तरूण शेतकऱ्यांनी पिवळ्या रंगाचे पिपे तयार करून त्या लाईट लावून ते शेतात ठेवले. यात अनेक पतंग भाजून मरण पावले. व शेतकऱ्यांना बोंडअळी पासून कपाशी वाचविण्यात यश आल्याचे आशादायी चित्र येथे दिसून येत आहे. बोंडअळी निर्मूलनाचा कोरा पॅटर्न सध्या शेतकºयांसाठी लाभदायक ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरा : बोंडअळीचा प्रकोप रोखण्यासाठी कोरा येथील तरूण शेतकऱ्यांनी पिवळ्या रंगाचे पिपे तयार करून त्या लाईट लावून ते शेतात ठेवले. यात अनेक पतंग भाजून मरण पावले. व शेतकºयांना बोंडअळी पासून कपाशी वाचविण्यात यश आल्याचे आशादायी चित्र येथे दिसून येत आहे. बोंडअळी निर्मूलनाचा कोरा पॅटर्न सध्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरला आहे.
बोंडअळीबाबत युवा शेतकऱ्यांवर मिडीचा प्रभाव पडताना दिसत आहे. व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून अनेक व्हिडीओ व्हॉयरल होत आहे. व यातूनही संभ्रम निर्माण झाला आहे. काय करावे व काय करू नये अशी परिस्थिती शेतकरी वर्गासमोर आहे.
कोरा परिसरात निंबोळी अर्काची मागणी वाढली. १ हजार पीपीएम पासून ते १० हजार पीपीएम पर्यंत निंबोळी अर्क बाजारपेठेत मिळत आहे. त्याचप्रमाणे किटकनाशकांची फवारणी व जैविक किटकनाशकांची फवारणी झिरो बजेटचे तंत्रज्ञान यातही शेतकरी वर्ग वापर करू लागला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे बोंडअळीचे पतंग नष्ट करणे यावर कोरा परिसरातील युवा वर्ग जोर देत आहे. त्याकरिता कामगंध सापळ्यांचा वापर केल्या प्रचारात आलेला पिवळ्या कलरचा पिपा व त्यात फोकस लाईटचा वापर करून बोंडअळीचे पतंग संपविण्याचा प्रयत्न कोरा परिसरात केल्या जात आहे. युवा शेतकरी वर्ग सर्व शेतकºयांना सोबत घेवून १० ते १६ चे गट तयार करून पिवळ्या रंगाचा पिपा त्यात फोकस लाईट बसवून गुलाबी बोंडअळीचे पतंग मारण्यासाठी प्रत्येक शेतात बसविण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून या कामाला सर्वच शेतकरी जोमाने भिडले आहेत.
परिसरात कामगंध सापळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्या जात आहे. त्याच प्रमाणे पिवळ्या पिप्यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केल्या जात आहे. बोंडअळीच्या पतंगाप्रमाणेच मित्र किड्यांचे पतंगही यात येतात परंतु बोंडअळीच्या निर्मुलनाकरिता वापर करायला हरकत नाही.
नितीन खरात, कृषी सहाय्यक, कोरा
आम्ही पीपे तयार करून ते शेतात लावले. पिवळ्या रंगावर पंतग आकर्षित होते म्हणून पिवळ्या रंगाचे पीपे तयार केले. त्यात लावलेल्या लाईटमध्ये अनेक पतंग भाजून मरण पावले. एक लाईट चार एकर शेतीकरीता पुरेसा आहे. प्रत्येक शेतकºयांनी ही व्यवस्था करायला हवी.
नाना गुंडे, शेतकरी.