अस्वलाच्या शोधार्थ ‘कोम्बींग आॅपरेशन’

By admin | Published: January 16, 2017 12:39 AM2017-01-16T00:39:42+5:302017-01-16T00:39:42+5:30

सात महिन्यांमध्ये तब्बल आठ शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले करणाऱ्या अस्वलीच्या शोधार्थ पुन्हा ९ गावांमध्ये

'Combing Operation' for Aspiration | अस्वलाच्या शोधार्थ ‘कोम्बींग आॅपरेशन’

अस्वलाच्या शोधार्थ ‘कोम्बींग आॅपरेशन’

Next

नऊ गावांत ‘सर्च’ : शेतकऱ्यांच्या मळ्यांवर वनरक्षकांची गस्त
अमोल सोटे   आष्टी (शहीद)
सात महिन्यांमध्ये तब्बल आठ शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले करणाऱ्या अस्वलीच्या शोधार्थ पुन्हा ९ गावांमध्ये ‘कोम्बींग आॅपरेशन’ सुरू करण्यात आले. एसआरपीच्या २७ जवानांसह क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक, भूल देणारे डॉक्टर अशी ४२ जणांची चमू जंगलामध्ये भटकंती करीत आहे.
वन्यप्राणी अस्वल व दोन पिलांनी आष्टी व तळेगाव वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. शोध मोहिमेदरम्यान वारंवार क्षेत्र बदलत आहे. आष्टी क्षेत्रांतर्गत एकूण १३ हजार ५९७ हेक्टर क्षेत्र आहे. वन्यप्राण्यांचा या मोठ्या विस्तृत क्षेत्रात वावर आहे. यातील अस्वलीचाच अधिक त्रास आहे. कोम्बींग आॅपरेशनमध्ये मुबारकपूर, चामला, बोरखेडी, थार, माणिकवाडा, तारासावंगा, जामगाव, किन्ही, मोई या ९ गावांच्या जंगलांचा समावेश आहे. चार दिवसांपर्वूी मुबारकपूर येथील शेतकरी कालोकरवर अस्वलीने हल्ला केला. यामुळे गंभीर अवस्थेत वनविभागाने त्यांना उपचारार्थ अमरावतीला भरती केले. ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत असल्याने अस्वल शोध मोहिमेबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना एसआरपीची मागणी केली. शनिवारपासून नऊ गावांमध्ये ‘कोम्बींग आॅपरेशन’ सुरू करण्यात आले आहे.

८ शेतकऱ्यांवर झाले अस्वलीचे हल्ले
मोई मौजात पद्माकर डाखोळे (४०) यांच्यावर २१ जुलै २०१६ मध्ये हल्ला केला. १ आॅगस्ट २०१६ रोजी बोटोणा बिटात प्रल्हाद पवार, १७ आॅगस्ट २०१६ रोजी मोई येथील शेतकरी ज्ञानेश्वर पवार, २२ सप्टेंबर २०१६ रोजी पुंजाराम परतेकी माणिकवाडा, ९ जानेवारी २०१७ रोजी साहेबराव कालोकर मुबारकपूर अशा पाच शेतकऱ्यांवर आष्टी क्षेत्रात अस्वलीने हल्ला केला तर ३ शेतकऱ्यांवर तळेगाव रेंजमधील क्षेत्रात हल्ले चढविलेत.

Web Title: 'Combing Operation' for Aspiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.