परिवर्तनवादी संघटनांकडून प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन

By admin | Published: December 26, 2016 01:34 AM2016-12-26T01:34:12+5:302016-12-26T01:34:12+5:30

हजारो वर्षे चातुर्वर्ण व्यवस्थेत दबलेल्या तमाम वंचित, शोषित आणि स्त्रियांना न्याय, हक्क, सन्मान आणि

Combustion of symbolic manuscripts by transformationist organizations | परिवर्तनवादी संघटनांकडून प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन

परिवर्तनवादी संघटनांकडून प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन

Next

महाराष्ट्र अंनिसच्यावतीने ‘स्त्री मुक्ती दिन’ कार्यक्रम
वर्धा : हजारो वर्षे चातुर्वर्ण व्यवस्थेत दबलेल्या तमाम वंचित, शोषित आणि स्त्रियांना न्याय, हक्क, सन्मान आणि स्वातंत्र्य नाकारून विकासाच्या प्रवाहापासून दूर ठेवणाऱ्या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे दहन केले होते. तो दिन आजचा होता. ‘स्त्री मुक्ती दिन’ म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ, राष्ट्रीय संबुद्ध महिला संघटना व सत्यशोधक महिला प्रबोधिनी आणि विविध परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
प्रारंभी सेवाग्राम व पिपरी (मेघे) येथील सरपंच रोशना जामलेकर, कुमुद लाजुरकर यांच्यासह वंदना पेंदाम, पद्मा तायडे, शारदा झामरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर शोषितांचे व स्त्रियांचे हक्क नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करून निषेध नोंदविण्यात आला. कार्यक्रमाला प्रा. शेख हाशम, डॉ. सिद्धार्थ बुटले, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धनराज तेलंग, शारदा झामरे, पद्मा तायडे यांनी विचार मांडले. प्रकाश कांबळे, सुनील ढाले, अजय मोहोड यांनी संविधान गीत सादर केले.
प्रास्ताविक गजेंद्र सुरकार यांनी केले. संचालन प्रकाश कांबळे यांनी तर आभार डॉ. बुटले यांनी मानले. कार्यक्रमाकरिता किशोर ढाले, प्रशिल मेश्राम, मनोज धोटे, प्रा. मोहनिश सवाई, प्रा. अरविंद पाटील, गौतम टेंभरे, भास्कर भगत, तनवी उमरे, महादेव शेंडे, रत्नमाला साखरे आदिंनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

सम्यक बुद्ध विहारातही कार्यक्रम
४वर्धा- स्थानिक सम्यक बुद्ध विहार सांस्कृतिक भवन, प्रबुद्ध नगर, म्हसाळा येथे मनुस्मृती दहन कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रकाश कांबळे, कान्होपात्रा वैद्य, अ‍ॅड. हर्षवर्धन गोडघाटे, संघरत्न रामटेके, छाया कांबळे, हरिका ढाले, सुहानी ढाले उपस्थित होते. यावेळी सुनील ढाले यांनी विचार व्यक्त केले.

Web Title: Combustion of symbolic manuscripts by transformationist organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.