गणरायाचे जल्लोषात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:08 PM2018-09-13T13:08:43+5:302018-09-13T13:09:19+5:30
ओझर : तमाम महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या बाप्पांचे थाटात आगमन झाले.
ओझर : तमाम महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या बाप्पांचे थाटात आगमन झाले. ओझर येथील घरोघरी बाप्पांच्या आगमनाची चाहूल गुरुवार पहाटे पासून सुरू होती.मेनरोड परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मूर्ती व गणरायाला लागणाऱ्या साहित्य खरेदीची लगबग दिसून आली तर अनेक घरातील मोठ्या मंडळींनी आगाऊ बुकिंग केलेल्या मूर्ती मुहूर्त साधून आपल्या चिमुकल्यांसोबत नेण्याचा आनंद घेतला.प्रियदर्शनी शॉपिंग ते नानासाहेब अक्कर चौकापर्यंत बॅरिकेडिंग होती.दुपारी बारा वाजेपर्यन्त शुभ मुहूर्त असल्याने भल्या सकाळपासून बाजारात गर्दी उसळली होती. गावातील मंडळांमध्ये मानाचा राजाचे सोमवारी आगमन झाले होते तर ओझरच्या राजाचे पूर्वसंध्येला थाटात आगमन झाले.नागेश्वर चौक मित्रमंडळाची शाही मिरवणूक झाली.सिद्धिविनायक पतसंस्थेत संचालक मंडळाने एकत्र येत पूजा विधी केली. इतर मंडळांमध्ये तांबट लेन, शिवाजी रोड रूपेश्वर मित्र मंडळ, महाराणा प्रताप चौक, हनुमान चौक, टाऊनशीप येथील मित्र मंडळ मेनरोड मित्र मंडळ, शंभूराजे मित्र मंडळ, जय मल्हारचौक, ग्रामपालिका, ओझर कार्यकारी सोसायटी इत्यादी मंडळ सकाळपासून प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी लगबग करत होते.शाळांना सुट्टी असल्याने चिमुकल्यानी गणरायाचे स्वागत केले.पोलिसांची विशेष कुमक तैनात होती.