स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 09:45 PM2019-01-10T21:45:48+5:302019-01-10T21:46:40+5:30
विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी तसेच शिक्षण निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने सर्वांनी अध्ययनरत असावे, असे विचार आमदार रणजित कांबळे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी तसेच शिक्षण निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने सर्वांनी अध्ययनरत असावे, असे विचार आमदार रणजित कांबळे यांनी व्यक्त केले.
शिक्षण विभाग, पंचायत समिती देवळीच्या वतीने अडेगाव येथील बोधिसत्व विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती विद्या भुजाडे होत्या. अडेगावच्या सरपंच वर्षा इंगळे, डी. एम. थूल, माजी सभापती मोरेश्वर खोडके, लक्ष्मण कांबळे, पं. स. सदस्य अमित गावंडे, सुरेश ठाकरे, अशोक सराटे, संगीता नाकट, गटविकास अधिकारी बारापात्रे, गटशिक्षणाधिकारी सतीश आत्राम, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश रेवतकर, मुख्याध्यापक मनीष थूल, माणिक इंगळे, अरविंद लोखंडे, हनुमंत नाखले यांची उपस्थिती होती. प्राथमिक व माध्यमिक गटासाठी तीन फेरीत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
संचालन प्राथमिक गट गौतम शिंपी, राजेश नंदागवळी तर माध्यमिक गटाचे राजेंद्र गणवीर, सुहास गवते, मनीष जगताप यांनी केले. प्रास्ताविक थूल तर संचालन मृणालिनी दातार व रमेश पोराटे यांनी केले. आभार धनंजय खोंडे यांनी मानले.