लाचखोराची बिनधास्त तक्रार करा, तो जेरबंद होईल अन् कामही होईल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 05:00 AM2021-11-03T05:00:00+5:302021-11-03T05:00:20+5:30
सरकारी कार्यालयात काम घेऊन गेल्यास जर कुठला अधिकारी काम पूर्ण करण्यासाठी लाच मागत असेल तर त्याला घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून थेट तक्रार नोंदवावी. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होऊन तुमचे कामही लवकर होईल, त्यामुळे नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सरकारी कार्यालये असल्यामुळे या ठिकाणी लाचखोरांवर कारवाईही जोरात सुरू असते. एसबीच्या अंतर्गत तीन वर्षांत तब्बल २० लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून यावर्षी मात्र, केवळ दोघांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
कामासाठी लाच देणारी व्यक्ती काही तरी बेकायदा काम घेऊन आलेली असते. असे काम केल्यास सरकारी अधिकाऱ्याची नोकरी धोक्यात येऊ शकते.
हे लक्षात घेऊन सरकारी अधिकाऱ्यांनी अशी बेकायदा कामे घेऊन येणाऱ्यांच्या विरोधात तक्रारी कराव्यात तसेच एखादा अधिकारीच जर लाचेची मागणी करीत असेल तरी देखील नागरिकांनी बिनधास्तपणे आपली तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी, तुमचे कामही होईल आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाईदेखील होईल, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता तक्रारी कराव्यात, असे आवाहन लाचलुचपत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. लाच घेणाऱ्यांमध्ये गृहविभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, वनविभाग, शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, कामगार विभाग आदी विभागातील सराकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
अडलेले काम पूर्ण होणारच
-जे काम पूर्ण करण्यासाठी सरकारी अधिकारी लाच मागेल, ते काम लाच न देताही पूर्ण होईलच. त्यामुळे लवकर काम करण्यासाठी लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. जर सरकारी अधिकारी किंवा बाबू किंवा इतर कुणीही लाचेची मागणी करीत असेल तर थेट एसबीला कळवावे, तुमचे कामही होईल आणि लाचखोरावर कारवाईदेखील होईल.
या क्रमांकावर बिनधास्त करा तक्रार
-सरकारी कार्यालयात काम घेऊन गेल्यास जर कुठला अधिकारी काम पूर्ण करण्यासाठी लाच मागत असेल तर त्याला घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून थेट तक्रार नोंदवावी. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होऊन तुमचे कामही लवकर होईल, त्यामुळे नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा.
राज्यात एसीबीने सुरु केली हेल्पलाईन
nलाचखोरांना पकडण्यासाी मोठ्या प्रमाणात तक्रारदार पुढे यावेत, या हेतूने एसीबीने १०६४ ही टोल फ्री हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. राज्यभरात कुणीही २४ तास केव्हाही फोनवर तक्रार नोंदवू शकता.