ट्रक चालकांनी अपहरण केल्याची तक्रार

By admin | Published: July 15, 2015 02:35 AM2015-07-15T02:35:58+5:302015-07-15T02:35:58+5:30

दोन ट्रक चालकांनी एका अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्याचा प्रकार मंगळवारी पुलगाव येथे उघड झाला.

Complaint about the kidnapping of truck drivers | ट्रक चालकांनी अपहरण केल्याची तक्रार

ट्रक चालकांनी अपहरण केल्याची तक्रार

Next

पुलगाव ठाण्यात गुन्हा दाखल : तीन दिवसांपासून अल्पवयीन युवती बेपत्ता
वर्धा : दोन ट्रक चालकांनी एका अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्याचा प्रकार मंगळवारी पुलगाव येथे उघड झाला. या प्रकरणी युवतीच्या आजीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरूद्ध अपहारणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वराजसिंह कुशवाह व सत्यप्रकाश कुशवाह दोघेही रा. नेवरी, जि. आग्रा, उत्तरप्रदेश अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. आजच तक्रार झाल्याने या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. यात एक चमू तयार करून तक्रारीतील या दोन्ही ट्रक चालकांच्या गावी पाठविण्यात येणार असल्याचे ठाणेदार शिरतोडे यांनी सांगितले.
पोलीस सूत्रानुसार, पुलगाव ठाण्याच्या हद्दीतील नाचणगाव मार्गावरील खडकपूरा येथे १५ वर्षीय युवती तिच्या आजी सोबत राहत होती. हा मार्ग भोपाळकडे जात असल्याने या मार्गावरील ट्रक या परिसरातील चौकात थांबतात. यामुळे स्वराजसिंह कुशवाह व सत्यप्रकाश कुशवाह दोघेही या परिसरात काही दिवसांपूर्वी थांबले होते. सदर युवतीचे घर याच परिसरात असल्याने तिची या दोघांशी ओळख झाली. यानंतर या मार्गाने जाताना हे दोन्ही ट्रक चालक नेहमी थांबत होते. ते एक दोन तास नाही तर येथे तीन-चार दिवस थांबत असल्याची माहिती आहे.
अशातच शनिवारी (दि.११) स्वराजसिंह कुशवाह व सत्यप्रकाश कुशवाह हे दोघे तिथे मुक्कामाकरिता आले, त्याच दिवसापासून सदर युवती बेपत्ता असल्याचे तिच्या आजीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
या दोघांनी तिचे अपहरण केले असल्याचा आरोप पोलिसात करण्यात आलेल्या तक्रारीत आहे. या तक्रारीवरून पुलगाव पोलिसात या स्वराजसिंह कुशवाह व सत्यप्रकाश कुशवाह भादंविच्या कलम ३६३, ३६६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)
पवनार येथे विवाहितेचा विनयभंग
सदर युवती ही तिच्या आजीसोबत येथे वास्तव्यास होती. तिचे आई - वडील दुसऱ्या गावात राहतात. ती येथे राहत असतानाच तिची या दोन्ही ट्रक चालकांशी ओळख झाली. यातून तिचे अपहरण झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास पुलगाव पोलीस करीत असून काय सत्य बाहेर येते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
वर्धा- किराणा साहित्य आणण्यासाठी जात असलेल्या एका विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना पवनार येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सतीश लाखे असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला ही किराणा साहित्य आणण्यासाठी दुकानात चालली होती. दरम्यान, सतीश लाखे याने तिचा हात पकडून विनयभंग केला तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Complaint about the kidnapping of truck drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.