तीनही प्रकरणात पोलिसात तक्रार

By admin | Published: July 8, 2016 02:06 AM2016-07-08T02:06:36+5:302016-07-08T02:06:36+5:30

दुय्यम निबंधक कार्यालयाने केलेल्या अनागोंदीमुळे पोलीस प्रशासनाने ४ डिसेंबर २०११ रोजी संबंधितांविरूद्ध भादंविच्या ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

Complaint against the police in all three cases | तीनही प्रकरणात पोलिसात तक्रार

तीनही प्रकरणात पोलिसात तक्रार

Next

पुलगाव : दुय्यम निबंधक कार्यालयाने केलेल्या अनागोंदीमुळे पोलीस प्रशासनाने ४ डिसेंबर २०११ रोजी संबंधितांविरूद्ध भादंविच्या ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी काहींना अटकही करण्यात आली होती; पण पोलीस प्रशासन या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारापर्यंत पोहोचू शकले नाही. वास्तविक, खरेदी-विक्री करताना दोन्ही बाजूच्या व्यक्ती दुय्यम निबंधक कार्यालयात हजर असतात. अर्जनवीसही हजर असतो आणि आता दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयच म्हणते की, या दस्ताची नोंद कार्यालयाकडून केली नाही. मग, २ मे २००० च्या विक्रीपत्रावर नोंदविण्यात आलेल्या नोंदणी शुल्क ११ हजार २७० रुपयांचे काय वा हे नोंदणीपत्र या कार्यालयात कुणी व कसे आणले, हे गुलदस्त्यात आहे.
दुसरे प्रकरण देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील असून या प्रकरणी नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालय देवळी येथे करण्यात आली होती. या शेतीच्या खरेदी-विक्री प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची तक्रार चंदा दिलीप चेतवाणी रा. यवतमाळ यांनी देवळी पोलीस ठाण्यात केली होती. विद्यमान मुख्य न्यायदंडाधिकारी वर्धा, फौजदारी तक्रार क्र. १८०/२०१० नुसार गुन्हा क्र. ६५/११ नुसार २१ मे २०११ अन्वये नोंदवून भादंविच्या ४०६, ४१७, ४२०, ४६७, ४७१, २४ व १०९ कलमान्वये ११ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. यात रत्नापूर येथील नऊ, रत्नापूरचे तत्कालीन पटवारी व पुलगाव येथील एका अर्जनवीसाचा समावेश होता.
तिसरे प्रकरण पुलगाव नगर पालिकेच्या जागेची परस्पर विक्री प्रकरण असून सर्व्हे क्र. २६१/१ च्या सातबारा नोंदीनुसार ही जागा पुलगाव नगर पालिकेची असताना तिची विक्री एकाने दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करून दिली होती. हे प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहोचले होते. मंत्रालयातील लोकशाही दिन कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी केली. यात ५ नोव्हेंबर २०१२ रोजी नगर पालिकेच्या जागेची विक्री या जागेवर अतिक्रमण केलेल्या व्यक्तीने चक्क दुसऱ्या व्यक्तीला करून दिल्याची बाब पुढे आली. याची पुलगाव दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदही केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने या जागेच्या कागदपत्राची पाहणी केली; मात्र भूमापन क्र. २६१/१ या जागेचा सातबारा पाहता ही जागा पालिकेच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. तत्कालीन दुय्यम निबंधकांनी जागेच्या मालकी हक्काबाबत खात्री करणे गरजेचे होते. या प्रकरणी पुलगावच्या तत्कालीन दुय्यम निबंधकाने कर्तव्यात कसूर केल्याने व बेकायदेशीर पद्धतीने या जागेचा खरेदी-विक्री व्यवहार नोंदविल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट होते, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव नोंदणी महानिरीक्षकाकडे सादर केला. यातून सदर दोषीवर कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात आली होती.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Complaint against the police in all three cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.