वृक्ष जलसंवर्धनाचा आगळा वर्षपूर्ती दिन

By admin | Published: April 27, 2017 12:43 AM2017-04-27T00:43:28+5:302017-04-27T00:43:28+5:30

पाणी हे जीवन असल्याचे सारेच म्हणतो; पण प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर शहरालगतच्या हनुमान टेकडीवर पावसाचे पाणी अडवून

On the completion date of the tree anniversary of the water conservation | वृक्ष जलसंवर्धनाचा आगळा वर्षपूर्ती दिन

वृक्ष जलसंवर्धनाचा आगळा वर्षपूर्ती दिन

Next

व्हीजेएमचा हनुमान टेकडीवरील उपक्रम : १० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट
वर्धा : पाणी हे जीवन असल्याचे सारेच म्हणतो; पण प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर शहरालगतच्या हनुमान टेकडीवर पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासह पठार हिरवेगार करण्याकरिता वैद्यकीय जनजागृती मंचने हाती घेतलेला महत्त्वपूर्ण उपक्रम चांगलाच आकार घेऊ लागला आहे. या उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त बुधवारी हनुमान टेकडीवर छोटेखानी कार्यक्रमासह पुढील संकल्पसिद्धीबाबत नियोजन ठरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, जि.प. काँग्रेस गटनेते संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपवनसरंक्षक दिगंबर पगार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे उपिस्थत होते. प्रारंभी वर्षपूर्तीनिमित्त टेकडी परिसरात मान्यवरांच्या हस्ते पाच रोपांची लागवड करण्यात आली. यानंतर टेकडीच्या आकृतीतील आकर्षक केक कापून पहिला वर्षपूर्तीदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी उपलब्ध करून दिलेल्या वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान याबाबत रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचे वाचन करण्यात आले. व्हीजेएमने २६ एप्रिल २०१६ या दिवशी हनुमान टेकडीवरील श्रमदानाचे अभियान सुरू केले. प्रारंभी टेकडीवर उतरत्या क्रमाने प्रत्येक तीन फुटांच्या अंतरावर दोन फुट रूंद, दोन फुट खोल व आठ फुट लांब असे २०० समस्तर चर खोदण्यात आले.

 

Web Title: On the completion date of the tree anniversary of the water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.