अल्पवयीन मुलीवर बळजबरी

By admin | Published: February 6, 2017 01:03 AM2017-02-06T01:03:24+5:302017-02-06T01:03:24+5:30

नातेसंबंधातील एका युवकाने अल्पवयीन मुलीवर बळजबरी केल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली.

Compulsion on a minor girl | अल्पवयीन मुलीवर बळजबरी

अल्पवयीन मुलीवर बळजबरी

Next

गुन्हा दाखल : आरोपीला अटक; तीन वेळा केली जबरदस्ती
तळेगाव (श्या.पंत.) : नातेसंबंधातील एका युवकाने अल्पवयीन मुलीवर बळजबरी केल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली. या प्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून परिसरातील अमर जाधव (२२) रा. काकडधरा याच्यावर बलात्कारासह अल्पवयीन मुलीचे लैगिक शोषण केल्याप्रकारणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी उघड झाली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०१६ मध्ये पीडित मुलगी ही तिच्या मैत्रिणीकडे जेवणाकरिता गेली होती. येथून ती परत येत असताना तिच्या नातेसंबधात येत असलेल्या अमर जाधव याने तिला ‘मला तुझ्या आईने पाठविले आहे, चल मी घरी सोडून देतो’ असे म्हटले. तो ओळखीचा असल्याने पीडिता त्याच्या दुचाकीवर बसली असता त्याने तिला घरी न नेता एका बंद घरात नेले व तिच्यावर बळजबरी केली. शिवाय झालेल्या प्रकाराची कुठे वाच्चता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. असा प्रकार अमर याने एक वेळा नाही तर तब्बल तीन वेळा केल्याचे पीडिताने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
यातच तिला गर्भधारणा झाली. दरम्यान अमरने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. या गोळ्या घेतल्याने तिच्या पोटात दुखू लागल्याने हा प्रकार उघड झाला. याची माहिती तिच्या बहिणीला होताच तिने सदर प्रकार तिच्या आईला सांगितला. यावरून त्यांनी सदर प्रकराची तक्रार पोलिसात दिली. तक्रारीवरून अमरवर भादंविच्या कलम ३७६ आणि बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४, ६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक पटले, पेटकर करीत आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Compulsion on a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.