बोर व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांना सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:26 PM2018-03-25T22:26:48+5:302018-03-25T22:26:48+5:30

बोर व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांसाठी जंगल सफारीत विशेष सवलत देण्यात आली आहे. यात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ५० तर जिल्ह्याबाहेरील विद्याार्थ्यांसाठी २५ टक्के सवलत देण्यात आली आहे.

Concession to students in bore tiger project | बोर व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांना सवलत

बोर व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांना सवलत

Next
ठळक मुद्देतालुक्यातील ७५, जिल्ह्यातील ५० तर जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना २५ टक्के सुट

रितेश वालदे।
आॅनलाईन लोकमत
बोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांसाठी जंगल सफारीत विशेष सवलत देण्यात आली आहे. यात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ५० तर जिल्ह्याबाहेरील विद्याार्थ्यांसाठी २५ टक्के सवलत देण्यात आली आहे.
जंगल सफारीसाठी सकाळी ६ ते १२ व दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत आत सोडण्यात येते. सोमवारी जंगल सफारी बंद ठेवण्यात येते. जंगल सफारीसाठी बोरधरण गेटवर २० जिप्सी तर अडगाव गेटवर २० जिप्सी उपलब्ध आहेत. दोन्ही गेटवरून सकाळी २० व दुपारी २० जिप्सी सोडण्यात येतात. बोर व्याघ्र प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी बोरमध्ये २६ व अडेगावमध्ये १५ गाईड उपलब्ध करून देण्यात आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला येताना विद्यार्थ्यांनी वा शिक्षकांनी मुख्याध्यापकाचे पत्र व विद्यार्थ्यांची यादी आणणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील बोरधरण येथून जंगल सफारीचा आनंद घेता येतो. या दोन्ही ठिकाणाहून आॅनलाइन बुकींग सुविधा आहे. बोर व्याघ्र प्रकल्प १५ हजार ८१२.३२ हेक्टर (१३८.१२ चौरस किमी) मध्ये पसरला आहे. यात बोर व न्यू बोर, असे दोन भाग असून वर्धा व नागपूर जिल्ह्यात त्याची सिमा आहे. या दोन भागात जंगल सफारीसाठी ४७ किमी क्षेत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. इतर व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत आकाराने लहान म्हणून बोरची ओळख आहे. असे असले तरी येथील जैवविविधता, वन्य प्राण्यांचा अधिवास पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाची सफारी करताना येथील निसर्ग संपदा, पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल, रानडुकर, नीलगाय, सांबर, चित्तर, भेडकी, रानकुत्री, खवले मांजर आदी वनप्राण्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळतो. यामुळे बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांची पहिली पसंत ठरत आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा ही दोन अभयारण्ये जोडण्याची किमया बोरने साधली आहे. यामुळे बोरला महत्त्व प्राप्त झाले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात सागवान, तेंदु, बेहडा, धावडा, टेंभुर्णी, तिवस, मोहन, आडन, अचारलेडी आदी वनसंपदा आहे. जैवविविधतेने नटलेल्या या जंगलामध्ये झुडपी वेलवर्गीय प्रजातीचीही विविधता आढळून येते.
वनसंपदा व प्राण्यांमुळे विशेष आकर्षण
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्याने तथा अभयारण्ये आहेत. विदर्भात प्रामुख्याने मेळघाट, ताडोबा, पेंच, अंधारी, नवेगाव आणि कहाड (उमरेड) आदी व्याघ्र प्रकल्प आहेत. या अभयारण्याला भेटी देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असताना वाघाच्या अधिवासासाठी बोर व्याघ्र प्रकल्प ही नवी ओळख ठरत आहे. आकाराने लहान असले तरी येथील जैवविविधतेने नटलेल्या जंगलाला विशेष महत्त्व आले आहे.

Web Title: Concession to students in bore tiger project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.