शितदहीच्या कापूस वेचणीला विलंब
By admin | Published: October 5, 2014 11:10 PM2014-10-05T23:10:34+5:302014-10-05T23:10:34+5:30
मृग नक्षत्र कोरडे गेल्याने उशिरा झालेल्या कपाशीच्या पेरणीमुळे नवरात्रात सुरू होणाऱ्या शितदहीच्या कापूस वेचणीला विलंब झाला. यामुळे दिवाळी सणावर आर्थिक सावट निर्माण झाले आहे.
घोराड : मृग नक्षत्र कोरडे गेल्याने उशिरा झालेल्या कपाशीच्या पेरणीमुळे नवरात्रात सुरू होणाऱ्या शितदहीच्या कापूस वेचणीला विलंब झाला. यामुळे दिवाळी सणावर आर्थिक सावट निर्माण झाले आहे.
पावसाने दडी मारली, अशात शेतकऱ्यांनी कुठे ओलित तर कुठे पावसाच्या पाण्यावरून पीक वाचविले. ते कसेबसे जगविले; मात्र उत्पन्न मिळण्याची कुठलीही अशा नाही. अशात दसरा गेला. आतापर्यंत दसऱ्याला कापसाच्या खरेदीचा मुहूर्त होत आला आहे. यंदा मात्र हा मुहूर्त टळला. अशात दिवाळी तोंडावर आली आहे. गत वर्षी दिवाळीपूर्वी कापूस बाजारात आला होता. यामुळे शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना दिवाळी साजरी करता आली. यंदा मात्र तसे होण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. शेतकऱ्यांचा दिवाळी सण हा खरीप हंगामावरव अवलंबून राहिला आहे. यावेळी दिवाळीनंतरच कापूस शेतकऱ्यांच्या घरी येणार असल्याने त्याची पंचाईत होत आहे. अशात सोयाबीननेही धोका दिल्याने यंदा शेतकऱ्याची दिवाळी अंधरात जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नवरात्र सुरू होण्यापूर्वी दरवर्षी शितदहीच्या कापूस वेचणीला सुरुवात होत होती. दिवाळीपूर्वी घरी आलेला कापूस विकूण जुनी असणारी वार्षिक उधारी शेतकरी चुकता करून दिवाळी सण साजरा करीत आला आहे. (वार्ताहर)