वाशीम जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 06:05 PM2020-05-12T18:05:00+5:302020-05-12T18:05:23+5:30

सावंगी मेघे येथे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर सदर रुग्णावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात आय सी यु मध्ये उपचार सुरू आहेत.

The condition of a corona patient in Washim district is stable | वाशीम जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर

वाशीम जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर

Next
ठळक मुद्देएकाचवेळी हार्ट अटॅक, पक्षाघात आणि कोरोनाशी देतोय लढा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सावंगी मेघे येथे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर सदर रुग्णावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात आय सी यु मध्ये उपचार सुरू आहेत.

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील 64 वर्षांचा रुग्ण हार्ट अटॅकच्या उपचारासाठी 8 तारखेला सावंगी मेघे येथे दाखल झाला होता. त्यापूर्वी तो अकोला येथे अँजिओप्लास्टी करण्यासाठी गेला होता. मात्र तेथील उपचाराचा खर्च जास्त असल्यामुळे तो परत त्याच्या गावी गेला. त्यानंतर विशेष वाहनाने तो सावंगी मेघे रुग्णालयात दाखल झाला. त्यावेळी डॉक्टरांना त्याच्या शरीराचा डावा भागाला सौम्य पक्षाघातचा धक्का बसल्याचे लक्षात आल्यावर त्याचे सिटी स्कॅन करण्यात आले. त्यामध्ये त्याच्या मेंदूतील काही भागात रक्त पुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर तो रेड झोन मधून आलेला असल्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली व त्यात तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्याला कोरोनाचे एकही लक्षण अद्यापही नाही असे डॉ कलंत्री यांनी सांगितले. त्यामुळे सदर रुग्णाची पुन्हा 14 दिवसानंतर एकदा कोरोना चाचणी करण्यात येईल.
सदर रुग्णावर सध्या सेवाग्राम रुग्णालयात हार्ट अटॅक, पक्षाघात आणि कोरोनाचा उपचार सुरू आहे. रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे श्री कलंत्री यांनी सांगितले.

रुग्णासोबत त्यावेळी दोन मुले, सासू, आणि ड्राइव्हर आले होते. त्यामुळे रुग्णाच्या निकट संपर्कात आलेली दोन मुले, आणि सावंगी रुग्णालयातील आतापर्यंत दोन कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर परिचारिका, वार्डबॉय अशा एकूण 31 व्यक्तींचे स्त्राव नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत यामध्ये रुग्णाच्या एका मुलाच्या अहवालाचाही समावेश आहे. उर्वरित 13 अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती उदय मेघे यांनी दिली.

Web Title: The condition of a corona patient in Washim district is stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.