काँग्रेसच्या सद्भावना भवनाची जप्ती टळली

By admin | Published: March 21, 2017 01:15 AM2017-03-21T01:15:43+5:302017-03-21T01:15:43+5:30

जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्यालय असलेल्या सद्भावना भवनावर पालिकेच्या मालमत्ता करापोटी तब्बल २ लाख ५० हजार रुपये थकले आहे.

The confiscation of Congress's Goodwill Bhavan was avoided | काँग्रेसच्या सद्भावना भवनाची जप्ती टळली

काँग्रेसच्या सद्भावना भवनाची जप्ती टळली

Next

मालमत्ता कराचे २.५० लाख थकले : पालिकेची कारवाई
वर्धा : जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्यालय असलेल्या सद्भावना भवनावर पालिकेच्या मालमत्ता करापोटी तब्बल २ लाख ५० हजार रुपये थकले आहे. या थकबाकीपोटी सोमवारी पालिकेच्या करवसुली पथकाने सद्भावना भवनाला सील ठोकण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान काँग्रेस कमिटीच्यावतीने सायंकाळपर्यंत कराची रक्कम भरण्याचे आश्वासन दिल्याने ही जप्तीची कारवाई टळली आहे. या कारवाईच्यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे स्वत: उपस्थित होत्या.
थकबाकी वसुलीकरिता वर्धा पालिकेची मोहीम

वर्धा : वर्धा पालिकेच्यावतीने थकीत कराची वसुली करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत थकबाकीदाराच्या घरासमोर बॅण्ड वाजविण्याचा निर्णय घेतला. यामुळे कराचा भरणा होत असल्याचे दिसत आहे. न.प.च्या मालमत्ता कराच्या वसुलीपोटी बॅचलर मार्गावर असलेल्या जिल्हा काँग्रेस कमेटीला नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्याकडे मालकत्ता कराचे २ लाख ५० हजार ७२७ रुपये थकलेले आहे. वेळोवेळी कराचा भरणा करण्यासाठी सांगितले परंतु, त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही.
परिणामी, सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास न.प.मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या नेतृत्त्वात कारवाई करण्याचा निर्णय घेत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदभावना सभागृह गाठले. यावेळी थकीत असलेल्या मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी सांगण्यात आले. मालमत्ता कराचा भरणा न केल्यास आम्ही जप्तीची कारवाई करू असेही यावेळी सांगण्यात आले. त्यावर सायकाळपर्यंत कराचा भरणा पालिकेत करण्यात येईल असे सांगण्यात आल्याने जिल्हा काँग्रेस कमेटीच्या सदभावना सभागृहावरील जप्तीची कार्यवाही टळली.
कर वसूली व जप्ती पथकात पालिकेचे प्रशासकीय अधिकारी अजय बागरे, अभियंता सुधीर फरसोले, रवींद्र जगताप, गजानन पेटकर, सतीश जाधव, चेतन कहाते, निखिल लोहवे, स्वप्नील खंडारे, विजय किंगावकर, दिलीप कुथे, अशोक ठाकूर, शिवाजी थोरात, मोहम्मद मुक्कीम, नाना परटक्के, एज्जाज फारुकी, अविनाश मरगडे, गायकवाड, लिलाधर निखाडे, मो. सादीक, अमोल कोडापे आदींचा सहभाग होता.
वर्धा नगर पालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा वेळीच भरणा करून वर्धा नगर पालिकेला सहकार्य करावे. तसेच वर्धेच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी केले आहे.(शहर प्रतिनिधी)


कराच्या वसुलीकरिता जप्त केली कार
स्थानिक स्टेशनफैल येथील भरतकुमार प्रवीणकुमार पटेलिया यांच्याकडे नगर परिषदेच्या मालमत्ता कराचे ४ लाख ९५ हजार रुपये थकीत आहे. मालमत्ता कराचा भरण्यासाठी त्यांना वेळोवेळी नोटीसही बजावण्यात आली. तसेच समजही देण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने व मालमत्ता कराचा अद्यापही भरणा न करण्यात आल्याने त्यांची एम. एच. ४० टी.सी. ७५ क्रमांकाची नवीन कार जप्त करण्यात आली. शिवाय त्यांच्या मालकीच्या चार गोदामांना सील करण्यात आल्याचे पालिकेने कळविले आहे.

Web Title: The confiscation of Congress's Goodwill Bhavan was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.