अस्पष्ट एसएमएसमुळे संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:05 AM2017-10-27T01:05:48+5:302017-10-27T01:06:00+5:30

शासनाच्यावतीने शेतकºयांना लाभ होण्याच्या उद्देशाने आॅनलाईन पद्धतीने शासकीय खरेदी सुरू केली. यात शेतकºयांच्या नोंदी करण्यात येत आहे.

The confusion caused by blurring SMS | अस्पष्ट एसएमएसमुळे संभ्रम

अस्पष्ट एसएमएसमुळे संभ्रम

Next
ठळक मुद्देआॅनलाईन नोंदीत घोळ कायमच : शेतकºयांचा उडतो गोंधळ

रूपेश खैरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाच्यावतीने शेतकºयांना लाभ होण्याच्या उद्देशाने आॅनलाईन पद्धतीने शासकीय खरेदी सुरू केली. यात शेतकºयांच्या नोंदी करण्यात येत आहे. या नोंदीदरम्यान येणारा एसएमएस म्हणजेच आपल्या शेतमालाची खरेदी झाली असा समज शेतकरी करीत आहे. यामुळे शेतकºयांचा चांगलाच गोंधळ उडत आहे. हा प्रकार थांबविण्याकरिता शासनाच्यावतीने शेतकºयांना एसएमएस बाबत माहिती देण्याची गरज आहे.
खुल्या बोलीच्या तुलनेत आॅनलाईन व्यवहारात शेतकºयांना अधिक लाभ होत असल्याचे शासनाने म्हणणे आहे. यामुळे शासनाच्यावतीने आॅनलाईन खरेदीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. हा व्यवहार वर्धेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतही सुरू करण्यात आला. हा निर्णय घेतेवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाºया शेतकºयांना तसे मार्गदर्शन होणे गरजेचे होते; मात्र शासनाकडून तसे झाले नाही. परिणामी आता शेतकºयांचा गोंधळ उडत आहे. एसएमएस येताच शेतकºयांकडून त्यांचा शेतमाल बाजारात आणण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे बाजारात शेतकºयांची गर्दी होत गोंधळ उडत आहे.
सध्या शेतकºयांच्या घरी त्याचा शेतमाल आला आहे. यात असलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्याच्याकडून तो शेतमाल विकण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे बाजारात शेतकºयांची गर्दी होत आहे. यात प्रत्येकाला हमीभाव मिळण्याची अपेक्षा आहे; मात्र शासकीय खरेदी केंद्रावर होणारी गर्दी आणि आॅनलाईनची अट यामुळे केंद्रावर शेतकºयांची गर्दी होवून उद्रेक होत आहे. याचा प्रत्यय वर्धेत बुधवारी आला. वर्धा बाजार समितीत आंदोलन होत उड्डाण पुलावर रस्ता रोको करण्यात आला. यावेळी शेतकºयांनी हमीभावाची मागणी केली. असे प्रकार टाळण्याकरिता शासनाच्यावतीने विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेतकºयांना संदेश पाठविताना सुधारणा गरजेची
शासनाच्या सूचनेनुसार खरेदीकरिता शेतकºयाची आॅनलाईन नोंद होताच त्याला एक एसएमएस पाठविण्यात येतो. या संदेशात शेतकºयांना त्याचा आयडी आणि नोंदीची माहिती दिल्या जाते. या नोंदीच्या माहितीनंतर त्याचा शेतमाल कोणत्या दिवशी येथे आणावा याची माहिती देण्यात येणार आहे. मात्र पहिल्या संदेशात असा कुठलाही उल्लेख नसल्याने शेतकºयांची तारांबळ उडत आहे. शेतकºयांचा उडत असलेला हा गोंधळ कमी करण्याकरिता शासनाच्यावतीने पाठविण्यात येत असलेल्या संदेशात सुधारणा करण्याची गरज निर्माण आहे.
आॅनलाईन आॅक्शनमध्ये वर्धा बाजार समिती अव्वल
शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन आॅक्शनमध्ये वर्धा बाजार समिती राज्यातील एकूण ३० बाजारसमितीतून अव्वल स्थान पटकावून आहे. यामुळे येथून शेतकºयांना मोठ्या लाभाची आशा व्यक्त करण्यात येत आहे. या आॅनलाईन आॅक्शनमध्ये शेतकºयांच्या इतर भागातील खरेदीदार मिळत असून त्यांना वाढीव दर मिळण्याची संधी निर्माण होत असल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली आहे.

Web Title: The confusion caused by blurring SMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.