राफेलप्रकरणी काँग्रेसने दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 08:22 PM2018-12-26T20:22:33+5:302018-12-26T20:22:47+5:30

राफेल विमान खरेदी हा देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. या विमान खरेदी गैरव्यवहाराच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.

Congress has given dues to Rafael | राफेलप्रकरणी काँग्रेसने दिले धरणे

राफेलप्रकरणी काँग्रेसने दिले धरणे

Next
ठळक मुद्देचारूलता टोकस यांचे नेतृत्व : चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती गठित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राफेल विमान खरेदी हा देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. या विमान खरेदी गैरव्यवहाराच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
राफेल खरेदी महाघोटाळ्यामुळे देशाच्या सरकारी तिजोरीला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सरकारी कंपनी हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक्स लिमिटेडकडे डोळेझाक करून भांडवलदारांना लाभ मिळवून देण्याचा हा प्रकार असून चौकशीसाठी समिती गठित करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये राफेलच्या किमतीमुळे सरकारी तिजोरीचे ४१.२०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. काँग्रेसच्या काळात १२६ विमान ५२६.१० कोटी याप्रमाणे व्यवहार ठरला होता. भाजप सरकारने हा व्यवहार ३६ विमानांसाठी करून १६७०.७० कोटी रुपयांनी विमान खरेदी केले. अशाप्रकारे ४१.२०५ कोटी रुपयांचा चुना सरकारी तिजोरीला लावला. हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक्स लिमिटेड या पब्लिक सेक्टरमधील कंपनीकडून ३० हजार कोटी रूपयांचे आॅफसेट कॉन्ट्रक्ट आपले भांडवलदार मित्र अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला दिले. पंतप्रधान मोदी यांनी कायदे मंत्रालयाची परवानगी नसतानाही ही अट काढून घेतली. आदी महत्त्वाचे मुद्दे विचारात घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने संयुक्त चौकशी समितीची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, हेमलता मेघे, इंद्रकुमार सराफ, मोरेश्वर खोडके, धैर्र्यशील जगताप, शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, श्याम देशमुख, बाळा जगताप, बाबा अब्दुल जलील, इरफान बेग, मोहम्मद इजाज, जावेद खान, शादीक शेख, नवाज लाभा साहाब, विजय जयस्वाल, पांडुरंग देशमुख, धर्मपाल ताकसांडे, डेहणे पाटील, पंढरी कापसे, लक्ष्मणराव कांबळे, प्रवीण उपासे, हातीम शेख, विपीन राऊत, अमित गावंडे, अर्चना टोणपे, मनोज चौधरी, रंजना पवार, अनिता श्रीवास्तव, अरुणा धोटे, नरेंद्र सावरकर, मुकुंदा कामडी, अर्चना मून, मंजूषा देशमुख, कुंदा भोयर, सुवर्णा भोयर, रोशन जावळेकर, प्रभाकर थोटे, कमलाकर पिंपळे, राजेश राजूरकर, मिलिंद मोहोड, बाबाराव निवल, राजू राजुकरकर, चंदु सुटे, नंदू कांबळे, सुकेशनी धनविज उपस्थित होते.
 

Web Title: Congress has given dues to Rafael

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.