काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया बंद खोलीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:32 PM2017-09-09T23:32:32+5:302017-09-09T23:32:48+5:30
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षातील गटबाजी वर्धा जिल्ह्यात संपलेली नाही. त्यातच अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या सूचनेनुसार पक्षाच्या अंतर्गत निवडणुका सध्या सुरू करण्यात आल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षातील गटबाजी वर्धा जिल्ह्यात संपलेली नाही. त्यातच अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या सूचनेनुसार पक्षाच्या अंतर्गत निवडणुका सध्या सुरू करण्यात आल्या आहे. मात्र वर्धा जिल्ह्यात या निवडणुका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या घरातच बंद दार घेण्यासाठी धडपड चालविलेली आहे. पक्षाच्या निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांना या निवडणुकीचा मागमूगही नाही. पक्षाचा नवा जिल्हाध्यक्ष कोण होणार याचीही कुठे चर्चा नाही. चर्चा न करताच या निवडणुका आटोपून आपल्या मर्जीतला रखवालदार अध्यक्ष करण्याच्या हालचाली पुन्हा जोरात सुरू झाल्या आहे.
ज्या काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी वर्धेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात रणशिंग फुंकले त्या पक्षाच्या अनेक मोठ्या बैठका या पूर्वी वर्धेतून पार पडल्या. आणीबाणीनंतरही वर्धा जिल्ह्याने काँग्रेसला साथ दिली. नव्हे तर इंदिरा गांधींच्या अडचणींच्या काळात इंदिराजींनी पवनार व सेवाग्राम आश्रमात येवून ऊर्जा मिळविली व काँग्रेस पक्षाला नवी संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. त्या काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते वर्धा जिल्ह्यातून निर्माण झाले. यामध्ये कमलनयन बजाज, श्रीमन्ननारायण, प्रभा राव, वसंत साठे, प्रमोद शेंडे, डॉ. शरद काळे यांच्यासह अनेक दुसºया व तिसºया फळीतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला वैभव मिळवून दिले.
काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक दिग्गज नेत्यांनी वर्धा जिल्ह्यात उल्लेखनीय काम केले. यातील अनेक नेते कालांतराने पक्षाच्या राज्य व राष्टÑीय स्तरावरही पोहचले. त्या पक्षाची विद्यमान स्थितीत अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पक्षाचे दोन आमदार जिल्ह्यात असूनही पक्षातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला दिसून येत आहे. काही महिण्यांपूर्वी पार पडलेल्या प्रदेशाध्यक्षाच्या दौºयाला आमदार स्वत: अनुपस्थितीत राहु शकतो यावरून पक्षातील परिस्थितीचा अंदाज येतो. जिल्हाध्यक्ष नावालाच उरला असून संघटनात्मक निवडणुकीच्या माध्यमातून नवा जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. पंजाब येथील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते निरीक्षक म्हणून येथे आलेत. मात्र त्यानंतर पुढे निवडणुकीचे प्रक्रियेचे काय झाले याचा थांगपत्ता कुणालाही लागला नाही. भाऊ बहिणच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ठरवेल अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस राहिलेल्या एका नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. पक्षाचे आमदार अमर काळे व वर्धा विधानसभा मतदार संघातून पराभूत झालेले उमेदवार शेखर शेंडे यांनाही या निवडणुकीचा कार्यक्रम काय चालला आहे. याची माहिती नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. भाजपचा सर्वत्र झंझावात सुरू असताना काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांची अशी चोरीछुप्पी पद्धत कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे.
तालुका निवडणूक अधिकाºयांविषयी माहिती गुलदस्त्यातच
निवडणुका घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जिल्हा निवडणूक निरीक्षक नियुक्त केला. त्यानंतर तालुका स्तरावर निवडणूक निरीक्षकाची नेमणूक करावयाची होती. मात्र वर्धा जिल्ह्यात आठ तालुक्यात कोण निवडणूक निरीक्षक आहेत याची माहिती ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यांना नाही. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. काहींनी प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांच्याकडे संपर्क केला तर तेही समाधान करू शकले नाही, अशी माहिती आहे.