पिपरीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरली भाजपची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:56 PM2019-05-26T23:56:54+5:302019-05-26T23:57:41+5:30
कारंजा तालुक्यातील पिपरी येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे मतदार संघातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : कारंजा तालुक्यातील पिपरी येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे मतदार संघातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी आमदार दादाराव केचे यांनी विधानसभा क्षेत्रात विकास कामाचा सपाटा लावला आहे. सोबतच भाजप प्रणीत गटाची ग्रामपंचायतवर सत्ता आल्यापासून पिपरी गावाच्या विकासाला चालना मिळाल्याने पिपरी ग्रामपंचायतचे सदस्य मंगेश मानमोडे, संजय नेहारे, धम्मपाल दाभणे, गिताबाई भिलकर, वंदना दाभणे, रिना दाभणे, निर्जला डोबले, रेणुका डोबले, सारजा डोंगरे, लिलाबाई डोबले, शांता गाखरे, राजेंद्र देवासे, गणपत कालभूत, संजय गाडरे, मंजुळा ढोले, विद्या नेहारे, दुर्गा गाखरे, बेबी देवासे यांनी दादाराव केचे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला.
पिपरी गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीच भाजपात प्रवेश घेत असल्याचे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. प्रवेश घेणाऱ्यांचे दादाराव केचे यांनी स्वागत करित पिपरी गावाच्या विकासाकरिता आवश्यक सर्व बाबींची पुर्तता करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामपंचायत सदस्य नितीन गाखरे, श्रीराम राऊत, योगिता डोबले, मुकुंद बारंगे, भाजपाचे कारंजा तालुकाध्यक्ष धनराज गोरे, पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, हरिभाऊ धोटे, माजी सरपंच सुनिता गोरे, चक्रधर डोंगरे, धनराज दाभणे, विनोद डोंगरे, प्रकाश डोबले, चेतन देशमुख, चंद्रशेखर डोबले, वसंतराव देशमुख, चंद्रशेखर कालभूत, नरेंद्र डोबले, नरेंद्र पांढुरकर, दिलीप डोंगरे, धनराज डोबले, सुरेश डोबले, राजेश डोंगरे, सुरेश डोबले, प्रतिक डोबले, श्यामसुंदर चोपडे, मंगेश देवासे, अनिकेत डोबले यांच्यासह तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.