शेतकरी हिताचा विचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 10:11 PM2019-06-01T22:11:19+5:302019-06-01T22:12:20+5:30
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार नुकतेच सत्तारुढ झाले आहे. या सरकारला जनतेने मोठा जनादेश दिला. या सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. मात्र, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो सुखी झाला पाहिजे या दृष्टीने सरकारने नियोजन करावे असे मत जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी मांडले...
लोकमत न्यूज नेटवर्क

शेतकऱ्यांसाठी सरकारने नेमके काय करायला हवे?
लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. मोठा जनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मिळाला. हा जनादेश लोकांच्या अपेक्षांची पुर्तता करण्यासाठी देण्यात आला आहे. सर्वप्रथम देशाचा पोशिंदा असा शेतकरी शेतात वर्षानुवर्षे राबतो. शेतातील उत्पादीत मालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव मिळत नाही. त्यामुळे तो सदैव कर्जात असतो. शेतकरी हा कर्जात जन्म घेतो, कर्जात वाढतो आणि कर्जाच्या ओझातच आत्महत्या करतो. त्याला वाचविणे गरजेचे आहे. सर्व प्रकारच्या उत्पन्नावर अर्धा टक्के किंवा एक टक्का सुपरचार्ज लावून शेतकºयाला त्याच्या पेरणीच्यावेळी ५ हजार प्रति एकर प्रमाणे अनुदान दिल्यास शेतकºयाला निश्चितच मदत होईल, या दृष्टीने निर्णय मोदींजींनी घेतला पाहिजे. शेतकरी हितार्थ मोदी सरकारने शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्या बैठकीत काही निर्णय घेतले. ते स्वागतार्ह आहेत. त्यात शेतकरी आणि जवानांचा विचार केला गेला आहे.
नव्या सरकारबाबत सर्वसामान्य लोकांना आणखी काय अपेक्षीत आहे?
अखंड भारताच्या निर्माणतेसाठी कलम ३७०, ३५ (अ) रद्द करून काश्मिर हा भारताचा अविभाज्य अंग आहे, हे सिद्ध करणे, काश्मिरमधून जे विस्थापित झाले आहे, त्यांना पुन्हा प्रस्थापित केले पाहिजे. निवृत्त सेनाधिकारी व फौजी यांना काश्मिरमध्ये निर्वासित केले पाहिजे. भारताची अस्मिता असलेले राम मंदिर ज्या प्रमाणे सरदार पटेल यांनी सोमनाथाच्या मंदिराला जागा देवून भोलेनाथाचे महत्व दाखविले. त्याचप्रमाणे मोदींनी अयोध्या येथील राम मंदिर निर्माण करून रामराज्य प्रस्थापित करावे, अशी लोकांची अपेक्षा आहे.