पाटबंधारे विभागामुळे वर्षभरापासून रखडले पुलाचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 06:00 AM2020-03-07T06:00:00+5:302020-03-07T06:00:10+5:30

पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २० जुलै २०१८ रोजी कंत्राटदाराला या पुलाच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश दिला असून वर्षभरात हे काम पूर्ण करायचे होते.

Construction of bridges maintained throughout the year due to irrigation department | पाटबंधारे विभागामुळे वर्षभरापासून रखडले पुलाचे बांधकाम

पाटबंधारे विभागामुळे वर्षभरापासून रखडले पुलाचे बांधकाम

Next
ठळक मुद्देपवनारच्या शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास : प्रशासनाला दिला सात दिवसाचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार/वर्धा : नजीकच्या पवनार येथील पवनार-वाहितपूर मार्गावरील धामनदीवर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र, बांधकामाच्या जागेपासून जवळच असलेल्या बंधाºयात पाणी साठवून असल्याने बांधकाम करणे शक्य होत नाही. यासंदर्भात पाटबंधारे विभागाला वारंवार सूचना करूनही सहकार्य केले जात नसल्याने गेल्या वर्षभरापासून पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माजी सरपंच अजय गांडोळे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना निवेदन देत येत्या सात दिवसांत पाणीपातळी कमी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २० जुलै २०१८ रोजी कंत्राटदाराला या पुलाच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश दिला असून वर्षभरात हे काम पूर्ण करायचे होते. दहा पिल्लरवर उभारण्यात येणाऱ्या या पुलाच्या आठ पिल्लरचे काम नदीपात्रातील पाणीपातळीमुळे अर्धवटच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार पुलाच्या बांधकामाकरिता प्रयत्नशील असून या पुलाच्या बांधकामापासून १ किलोमीटर अंतरावर एमआयडीसीकरिता असलेल्या बंधाºयामुळे येथे पाणी साठवूण राहात आहे. परिणामी, बांधकाम करण्यास अडचणीचे जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन बंधाºयातील पाणी सोडून पाण्याची पातळी कमी करण्यास सांगितले होते. मात्र, पाटबंधारे विभागाने ते शक्य नसल्याचे सांगितल्याने बांधकाम थांबलेले आहे. पावसाळ्यापूर्वीच बांधकाम करणे शक्य असल्याने आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या दिवसात हे बांधकाम पूर्णत्वास गेले नाही तर शेतकऱ्यांची बिकट वहिवाट कायम राहणार आहे.
त्यामुळे पाटबंधारे विभाग यांना एमआयडीसी बंधाऱ्याचे गेट खोलून पाण्याची पातळी कमी करण्यास आदेश द्यावे, जेणे करुन पुलाचे काम तीन महिन्याच्या आत पूर्ण करणे शक्य होईल, अशी मागणी पवनार येथील माजी सरपंच अजय गांडोळे, दुष्यंत खोडे, चंदू उमाटे, दिलीप वंजारी यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

बंधाऱ्यावरील पुलावरही लावला फलक
पवनार येथील धाम नदीपात्रात बांधण्यात आलेल्या एमआयडीसीच्या बंधाºयावरील पुलावरसुद्धा हा मार्ग वाहतुकीकरिता उपयोगाचा नसल्याचा फलक लावला आहे. त्यामुळे शेतकºयांपुढे शेती कशा पद्धतीने करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Construction of bridges maintained throughout the year due to irrigation department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.