चौपदरी महामार्गाचे बांधकाम उठले जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:34 PM2019-08-05T23:34:58+5:302019-08-05T23:35:32+5:30

चारपदरी महामार्ग प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे येथील यशोदा नदीच्या पुलाजवळील दोन मार्ग ग्रामीण भागातील लोकांसाठी तसेच देवळीकरांसाठी मृत्यूचे कारण ठरू पाहत आहे. याआधी या दोन्ही ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत संबंधितांना अनेकदा सूचना करूनसुद्धा सुधारणा होत नसल्याने नागरिकांत रोष आहे.

The construction of the Chowpadri Highway has come to an end | चौपदरी महामार्गाचे बांधकाम उठले जीवावर

चौपदरी महामार्गाचे बांधकाम उठले जीवावर

Next
ठळक मुद्देनियोजनशून्यता : यशोदा नदीजवळील अपघातप्रवण स्थळ

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : चारपदरी महामार्ग प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे येथील यशोदा नदीच्या पुलाजवळील दोन मार्ग ग्रामीण भागातील लोकांसाठी तसेच देवळीकरांसाठी मृत्यूचे कारण ठरू पाहत आहे. याआधी या दोन्ही ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत संबंधितांना अनेकदा सूचना करूनसुद्धा सुधारणा होत नसल्याने नागरिकांत रोष आहे.
यशोदा नदीच्या पुलावरील चारपदरी रस्त्यावर ग्रामीण भागातील गिरोली, अडेगाव, अंदोरी व परिसरातील अनेक गावांची वाहतूक आहे. या भागातील वाहतूक चारपदरी रस्त्यावर उजव्या बाजूने न काढता चुकीच्या मार्गावर डाव्या बाजूने काढण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातून देवळीकडे भुयारी मार्गाने जाणारी वाहतूक तसेच वर्धा मार्गाने येणारी महामार्गाची वाहतूक एकाच बाजूने येत आहे. तसेच देवळीकडून भुयारी मार्गाने खोलगट भागातून येणारी वाहतूक व महामार्गाच्या उंच पुलावरून यवतमाळकडे जाणारी वाहतूक नकळत एकाच ठिकाणी येत आहे. या दोन्ही ठिकाणी ‘ब्लार्इंड’ची स्थिती निर्माण झाल्याने वाहनचालकांचा जीव भांड्यात पडला आहे. चारपदरी महामार्ग प्रशासन तसेच दिलीप बिल्डकॉनच्या बेजबाबदारपणामुळे ही स्थिती ओढवली आहे.
त्याचप्रमाणे रस्त्यावरील पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याने यशोदा नदीच्या पुलाखालील भुयारी मार्गावर तलावसदृश स्थिती निर्माण झाली. या मार्गावर तीन फुटांपर्यंत पाणी साचून राहात असल्याने देवळी मार्गाने यवतमाळकडे जाणारी तसेच ग्रामीण भागातून देवळीकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच देवळीवरून वर्ध्याला जाणारी वाहने ढाब्याजवळील उंच पुलाचे खालून अरूंद रस्त्याने काढण्यात आली आहे. वर्ध्याकडे जाणारी व देवळीकडे येणारी वाहतूक या एकाच मार्गावर काढण्यात आल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. मार्गावर वाहतूक खोळंबून दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागत आहे. रस्ते बांधकामादरम्यान तांत्रिक बाबी न हाताळल्याने या भागातील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्ते बांधकाम प्रशासनाने बौद्धिक स्तर उंचावून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
रस्ते प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा कळस
जिल्ह्यात विकासकामांचा धडाका सुरू आहे. मात्र, सर्वच कामांत नियोजनाचा प्रचंड अभाव दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कामांचा दर्जाही विशेष नाही. तरीदेखील संबंधितांकडून डोळेझाक केली जात आहे. यात वाहनचालकांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

Web Title: The construction of the Chowpadri Highway has come to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.